Aarti Badade
विमानाने प्रवास करताना तुम्ही नोटीस केलं असेल की, बहुतेक विमानांमधील सीट्सचा रंग निळा असतो. पण हा रंग केवळ आकाशाशी मिळताजुळता आहे म्हणून निवडलेला नाही.
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal
मानसशास्त्रानुसार, निळा रंग विश्वासार्हता आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानला जातो. प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विमान कंपन्या या रंगाला प्राधान्य देतात.
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal
अनेक लोकांना विमानाने प्रवास करण्याची भीती वाटते, ज्याला 'एरोफोबिया' म्हणतात. निळा रंग मानवी मेंदूला शांत करतो, ज्यामुळे प्रवाशांची भीती कमी होण्यास मदत होते.
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal
तुम्हाला माहीत आहे का? सुरुवातीला विमानातील सीट्स लाल रंगाच्या होत्या. पण लाल रंग प्रवाशांमध्ये आक्रमकता आणि तणाव वाढवत असल्याचे लक्षात आल्यावर तो बदलून निळा करण्यात आला.
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal
निळा रंग गडद असतो, त्यामुळे सीट्सवर पडलेले डाग, धूळ किंवा घाण लवकर दिसत नाही. दीर्घकाळ सीट्स स्वच्छ दिसण्यासाठी हा रंग व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो.
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal
अनेक संस्कृतींमध्ये निळा रंग शांती आणि समृद्धीशी जोडला जातो. प्रवाशांचा प्रवास सुखाचा आणि आनंददायी व्हावा, या शुभ संकेतासाठीही निळा रंग निवडला जातो.
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal
निळा रंग डोळ्यांना थंडावा देतो आणि विश्रांतीची भावना निर्माण करतो. लांबच्या प्रवासात प्रवाशांना थकवा कमी जाणवावा, हा यामागचा मुख्य उद्देश असतो.
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal
जरी निळा रंग सर्वाधिक लोकप्रिय असला, तरी काही विमान कंपन्या राखाडी, तपकिरी किंवा त्यांच्या ब्रँडनुसार लाल रंगाच्या सीट्सही वापरतात. पण ८०% पेक्षा जास्त विमाने 'ब्लू'च असतात!
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal
Bluetooth Cancer Risk myth
Sakal