Saisimran Ghashi
ब्लॅक बॉक्स हे टायटॅनियम, स्टीलसारख्या जड धातूंनी बनवलेलं असतं.
जर संपूर्ण विमान हे अशाच धातूंपासून बनवलं, तर त्याचं वजन इतकं वाढेल की ते उडूच शकणार नाही किंवा इंधन प्रचंड लागेल.
विमान हलकं असायला हवं, म्हणजे ते कमी इंधनात जास्त अंतर जाऊ शकेल.
म्हणून विमान बनवण्यासाठी अल्युमिनियम मिश्रधातू, कॉम्पोझिट मटेरियल्स (जसं की कार्बन फायबर) वापरलं जातं हे हलकं आणि पुरेसं मजबूत असतं.
ब्लॅक बॉक्सचं उद्दिष्ट म्हणजे अपघातानंतर माहिती वाचवणे, प्रवासी वाचवणे नव्हे.
त्यामुळे तो अपघातात तग धरेल इतपत मजबूती देतात, पण संपूर्ण विमान तसंच बनवणं कार्यक्षम किंवा व्यवहार्य नाही.
ब्लॅक बॉक्ससारखं मटेरियल आणि त्यावर लागणारी प्रक्रिया प्रचंड खर्चिक असते.
संपूर्ण विमान तसं बनवलं, तर त्याची किंमत खूपच वाढेल आणि ते व्यावसायिकदृष्ट्या परवडणार नाही.