Mansi Khambe
रस्त्यांवर, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आणि धोकादायक मार्गांवर पिवळ्या रंगाचे बॅरिकेड्स लावलेली दिसतात.
Yellow Road Barricade
ESakal
मात्र या बॅरिकेड्सचा रंग पिवळाच का असतो? यामागचं रंजक कारण जाणून घ्या...
Yellow Road Barricade
ESakal
आपल्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये L, M आणि S अशा तीन प्रकारच्या शंकू पेशी (cone cells) असतात. या प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंगलांबींना प्रतिसाद देतात.
Yellow Road Barricade
ESakal
पिवळा रंग हा प्रामुख्याने L आणि M शंकू पेशींकडून मिळणाऱ्या संकेतांचे मिश्रण आहे. त्याची चमक आणि आजूबाजूच्या रंगांशी असलेला विरोधाभास यामुळे तो सहज लक्षात येतो.
Yellow Road Barricade
ESakal
तसेच कमी प्रकाशात रॉड पेशी अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे रंग ओळखण्याची क्षमता कमी होते.
Yellow Road Barricade
ESakal
तसेच पिवळ्या रंगावर पडणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण यावरूनही तो किती स्पष्टपणे दिसेल हे ठरते.
Yellow Road Barricade
ESakal
पिवळी पार्श्वभूमी आणि काळी पट्टी यांमधील विरोधाभासामुळे अडथळा रस्ता, धूळ आणि आजूबाजूच्या इतर वस्तूंपासून उठून दिसतो. यामुळे लोकांना पुढे अडथळा आहे हे समजण्यास मदत होते.
Yellow Road Barricade
ESakal
सुरक्षा चिन्हे देखील वेगवेगळे संदेश देण्यासाठी रंगांचा वापर करतात. लाल रंग तात्काळ धोका किंवा थांबण्याची गरज दर्शवतो, तर पिवळा रंग सहसा इशारा किंवा सावधगिरी दर्शवतो.
Yellow Road Barricade
ESakal
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal