पुठ्ठ्याचे बॉक्स नेहमी तपकिरी रंगाचे का असतात?

Mansi Khambe

पुठ्ठ्याचे बॉक्स

लहान असो वा मोठा, बहुतेक पॅकेजिंग बॉक्स तपकिरी रंगाचेच दिसतात. यामुळे पुठ्ठ्याचे बॉक्स नेहमी तपकिरीच का असतात? ते दुसऱ्या कोणत्याही रंगात बनवता आले नसते का? असा प्रश्न पडतो.

Box Brown Colour

|

ESakal

तपकिरी रंग

यामागचं कारण म्हणजे ज्यात कागद बनवण्याची प्रक्रिया, खर्च आणि बॉक्सची मजबुती यांचा समावेश आहे. यामुळेच पुठ्ठ्याचे बॉक्स नेहमी तपकिरी रंगाचे दिसून येतात.

Box Brown Colour

|

ESakal

क्राफ्ट पेपर

पुठ्ठ्याचे बॉक्स लाकडाच्या तंतूंपासून तयार केलेल्या क्राफ्ट पेपरपासून बनवले जातात. या कागदाला जास्त प्रमाणात ब्लीच करण्याऐवजी, त्याचा रंग नैसर्गिक रंगाच्या जवळ ठेवला जातो. यामुळे क्राफ्ट पेपर तपकिरी दिसतो.

Box Brown Colour

|

ESakal

कार्य

तसेच अनेक महागड्या भेटवस्तूंचे बॉक्स किंवा सौंदर्यप्रसाधनांचे पॅकेजिंग खूप चमकदार आणि रंगीबेरंगी असते. परंतु रोजच्या वापरातील पुठ्ठ्याच्या बॉक्सचे कार्य वेगळे असते.

Box Brown Colour

|

ESakal

उद्देश

पुठ्ठ्याचा बॉक्स वस्तू साठवणे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे त्यांना सुंदर रंगांची किंवा चकचकीत फिनिशची आवश्यकता नसते.

Box Brown Colour

|

ESakal

किंमत

एका साध्या पॅकेजिंग बॉक्सला चमकदार आणि रंगीत बनवण्यासाठी अतिरिक्त कागद, शाई आणि प्रक्रिया लागू शकते. यामुळे बॉक्सची किंमत वाढू शकते.

Box Brown Colour

|

ESakal

मजबुती

कार्टून बॉक्सच्या तपकिरी रंगाचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची मजबुती. क्राफ्ट पेपरचे लांब आणि मजबूत तंतू त्याला जड भार पेलण्यासाठी योग्य बनवतात.

Box Brown Colour

|

ESakal

बनवण्याची प्रक्रिया

कोरुगेटेड कार्डबोर्ड या कागदाचे अनेक थर एकत्र करून बॉक्स बनवला जातो. यात कागदाच्या सपाट थरांमध्ये एक लाटांसारखा थर असतो. ही रचना बॉक्सला दाब आणि धक्क्यांपासून वाचवण्यास मदत करते.

Box Brown Colour

|

ESakal

अनेक रंग

प्रत्येक कार्टून बॉक्स तपकिरीच असेल असे नाही. अनेक कंपन्या आपला ब्रँड दर्शवण्यासाठी बॉक्सवर लाल, निळा, काळा, पांढरा किंवा इतर रंगांमध्ये छपाई करतात.

Box Brown Colour

|

ESakal

फायदा

तपकिरी कार्टून बॉक्सचा आणखी एक फायदा म्हणजे वापरानंतर त्यांचा पुनर्वापर करता येतो. जुन्या कार्डबोर्डचा पुनर्वापर करून कागद आणि पेपरबोर्डसारखे साहित्य बनवता येते.

Box Brown Colour

|

ESakal

पूर्वीपासून वापर

तपकिरी कार्टून बॉक्सचा वापर पॅकेजिंगमध्ये खूप पूर्वीपासून केला जात आहे. कार्टून बॉक्सचा तपकिरी रंग केवळ ओळखच नाही, तर त्याची कमी किंमत, मजबूत कागद आणि सोपे पॅकेजिंगमुळे सर्वात सहज दिसणारा रंग आहे.

Box Brown Colour

|

ESakal

पुनर्वापर

म्हणून, पुढच्या वेळी तपकिरी रंगाचा पुठ्ठ्याचा बॉक्स एक सामान्य बॉक्स आहे असे समजू नका. यामागील संबंध कागद बनवण्याचे तंत्रज्ञान, बॉक्सची मजबुती, किंमत आणि पुनर्वापर यांमध्ये दडलेला आहे.

Box Brown Colour

|

ESakal

बँकेचे लॉकर कशापासून बनवले जातात... दरोड्यानंतरही ते सहजपणे का उघडता येत नाहीत?

Bank Lockers Safety

|

ESakal

येथे क्लिक करा