भारतातील बहुतेक पत्रपेट्या लाल रंगाच्या का असतात? जाणून घ्या कारण...

Mansi Khambe

टपाल सेवा

भारतातील टपाल सेवेला एक मोठा आणि गौरवशाली इतिहास आहे. शतकानुशतके पत्रे पोहोचवण्यासाठी पोस्ट ऑफिस आणि लेटर बॉक्सचा वापर केला जात आहे.

Red Letter Box

|

ESakal

ब्रिटिश निर्मिती

भारतीय टपाल सेवा ही एक ब्रिटिश निर्मिती आहे. जी लॉर्ड डलहौसी यांनी १८५४ मध्ये सुरू केली. त्या काळात आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्याचा हा सर्वात सामान्य मार्ग होता.

Red Letter Box

|

ESakal

लेटर बॉक्स

पण तुमच्या कधी लक्षात आले आहे का की भारतातील बहुतेक लेटर बॉक्स लाल रंगाचे का असतात? ही केवळ एक परंपरा आहे की यामागे काही विशेष कारण आहे?

Red Letter Box

|

ESakal

पत्रपेट्या

ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात हिरव्या रंगाच्या पत्रपेट्या वापरल्या जात होत्या. हिरवा रंग निसर्गात मुबलक प्रमाणात आढळतो, त्यामुळे तो लगेच लक्ष वेधून घेत नाही.

Red Letter Box

|

ESakal

लाल रंग

म्हणूनच लोकांना हिरव्या पत्रपेट्या शोधण्यात अनेकदा अडचण येत असे. असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पत्रपेट्यांचा रंग बदलून लाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Red Letter Box

|

ESakal

रंगकाम

टपाल सेवा सुरू झाल्यानंतर २० वर्षांनी म्हणजेच १८७४ मध्ये लाल रंगाच्या पत्रपेट्या सुरू करण्यात आल्या. सर्व पत्रपेट्या लाल रंगात रंगवण्यासाठी सुमारे १० वर्षे लागली.

Red Letter Box

|

ESakal

तरंगलांबी

लाल रंगाची निवड करण्यात आली कारण तो दुरून सहज दिसतो. लाल रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त आणि वारंवारता सर्वात कमी असते. ज्यामुळे तो दुरून सहज दिसतो.

Red Letter Box

|

ESakal

वापर

शिवाय तो तेजस्वी असल्यामुळे पत्रपेटीकडे सहज लक्ष वेधून घेतो. याव्यतिरिक्त, टपाल सेवेची गंभीरता दर्शवण्यासाठी आपत्कालीन आणि महत्त्वाच्या सूचनांसाठीही लाल रंगाचा वापर केला जातो.

Red Letter Box

|

ESakal

परंपरा

भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्येही लाल रंगाच्या पत्रपेट्या वापरल्या जातात. ब्रिटिशांनी ते जिथे जिथे गेले तिथे लाल पत्रपेट्या लावण्याची परंपरा सुरू केली.

Red Letter Box

|

ESakal

99% लोकांना माहिती नाही! भारतीय वाटणाऱ्या 'या' पदार्थांचा जन्म झालाय परदेशात

Indian food combos | ESakal
येथे क्लिक करा