Lizard Phobia: काही लोकांना पालीची इतकी भीती का वाटते, की रडूच येतं?

Anushka Tapshalkar

पाल दिसताच काहींची अक्षरशः घाबरगुंडी उडते

पाल पाहताच काही लोकांना हृदयाचे ठोके वाढतात, घाम फुटतो आणि त्या जागेत क्षणभरही थांबणं अशक्य वाटतं.

Why Are Some People So Afraid of Lizards

|

sakal

ही भीती फक्त पालची नसते

पालचं अचानक धावणं, तिचं रूप किंवा भिंतीवरून वेगाने सरकणं अनेकांच्या मनात तीव्र अस्वस्थता आणि किळस निर्माण करतं.

Why Are Some People So Afraid of Lizards

|

sakal

बालपणीचे अनुभव

लहानपणी पाल अंगावर पडणे, तिच्यामुळे घाबरण्याचा प्रसंग घडणे किंवा घरातील मोठ्यांना पाल पाहून घाबरताना पाहणं ही भीती अधिक वाढवू शकते.

Why Are Some People So Afraid of Lizards

|

sakal

मेंदूला लगेच धोक्याचा इशारा

पाल दिसताच काहींचा मेंदू तिला धोकादायक समजतो. त्यामुळे शरीरात घबराट, थरथर आणि तिथून लगेच दूर जाण्याची प्रतिक्रिया निर्माण होते.

Why Are Some People So Afraid of Lizards

|

sakal

रोजच्या आयुष्यावर परिणाम होऊ लागला तर...

पाल दिसेल या भीतीने एखादी खोली टाळणं, सतत भिंती आणि छत तपासणं किंवा घरात एकटं राहायला घाबरणं ही फोबियाची लक्षणं असू शकतात.

Why Are Some People So Afraid of Lizards

|

sakal

ही भीती कायमची नसते

योग्य समुपदेशन, CBT आणि हळूहळू भीतीला सामोरं जाणाऱ्या थेरपीच्या मदतीने अनेक जण पालची भीती मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात.

Why Are Some People So Afraid of Lizards

|

sakal

"पाल काही करत नाही" म्हणण्याऐवजी समजून घ्या

ज्यांना पालची भीती वाटते, त्यांच्यासाठी ती फक्त एक सरपटणारी प्राणी नसते. त्यामुळे त्यांच्या भीतीची थट्टा न करता त्यांना समजून घेणं आणि आधार देणं अधिक महत्त्वाचं आहे.

Why Are Some People So Afraid of Lizards

|

sakal

विश्वास बसणार नाही! मेळघाटातून उडालेला पक्षाचा 27 दिवसांत 3,334 किमीचा प्रवास, कुठे गेला?

This Tiny Bird Flew 3,334 KM in Just 27 Days!

|

eSakal

आणखी वाचा