महाभारतातील अर्जुनाने उर्वशीचे प्रेम का नाकारले?

Aarti Badade

अर्जुनाने उर्वशीला नकार का दिला?

महाभारतातील अर्जुन आणि अप्सरा उर्वशी यांची कथा प्रेम, धर्म आणि नियतीचा अनोखा संगम दर्शवते. उर्वशीने प्रेम व्यक्त करूनही अर्जुनाने तिला नकार दिला, पण पुढे याच घटनेचा त्याला अज्ञातवासात फायदा झाला.

Mahabharata Arjuna and Urvashi

|

Sakal

कोण होती अप्सरा उर्वशी?

उर्वशी ही इंद्राच्या स्वर्गसभेतील प्रसिद्ध अप्सरा होती. तिचे सौंदर्य, नृत्यकला आणि मोहक व्यक्तिमत्त्व यांची पुराणांमध्ये वर्णने आढळतात. राजा पुरुरवा आणि उर्वशी यांची प्रेमकथाही प्रसिद्ध आहे.

Mahabharata Arjuna and Urvashi

|

Sakal

अर्जुन स्वर्गात कशासाठी गेला?

वनवासाच्या काळात अर्जुनाने दिव्य अस्त्रे मिळवण्यासाठी तपश्चर्या केली. त्यानंतर तो इंद्राच्या स्वर्गात गेला. तिथे त्याने शस्त्रविद्येसोबत गंधर्व चित्रसेनाच्या मार्गदर्शनाखाली नृत्य आणि संगीताचेही शिक्षण घेतले.

Mahabharata Arjuna and Urvashi

|

Sakal

उर्वशी अर्जुनावर मोहित झाली!

अर्जुनाचे शौर्य आणि व्यक्तिमत्त्व पाहून उर्वशी त्याच्याकडे आकर्षित झाली. तिने त्याच्यापुढे आपल्या प्रेमाची भावना व्यक्त केली. मात्र, अर्जुनाने तिच्या प्रस्तावाचा स्वीकार करण्याऐवजी तिला मातेसमान मानले.

Mahabharata Arjuna and Urvashi

|

Sakal

अर्जुनाने प्रेमाचा प्रस्ताव का नाकारला?

उर्वशीचा संबंध अर्जुनाच्या चंद्रवंशातील पूर्वज राजा पुरुरवाशी असल्यामुळे अर्जुनाने तिला आदराने मातेसमान मानले. त्यामुळे तिच्या प्रेमाचा स्वीकार करणे त्याला धर्म आणि मर्यादेच्या दृष्टीने योग्य वाटले नाही.

Mahabharata Arjuna and Urvashi

|

Sakal

उर्वशीने अर्जुनाला दिला शाप!

अर्जुनाने प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे उर्वशी संतप्त झाली. तिने अर्जुनाला एका वर्षासाठी नपुंसकत्वाची अवस्था प्राप्त होण्याचा शाप दिला. मात्र, इंद्राने अर्जुनाला धीर दिला आणि भविष्यात हा शाप त्याच्या उपयोगी पडेल, असे सांगितले.

Mahabharata Arjuna and Urvashi

|

Sakal

शापाचे वरदान कसे झाले?

पांडवांच्या अज्ञातवासात अर्जुनाने ‘बृहन्नला’ हे रूप धारण केले. विराट राजाच्या दरबारात त्याने राजकन्या उत्तरेला नृत्य आणि संगीत शिकवले. अशा प्रकारे उर्वशीचा शाप अज्ञातवासात आपली ओळख लपवण्यासाठी उपयोगी ठरला, अशी महाभारतातील ही रंजक कथा सांगते.

Mahabharata Arjuna and Urvashi

|

Sakal

खंडोबाचा खंडा जेजुरीत कसा आला?

Khandoba Khanda jejuri

|

Sakal

येथे क्लिक करा