Payal Naik
रंजना देशमुख यांच्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री आजतागायत मराठी इंडस्ट्रीमध्ये झालेली नाही.
रंजना या आपल्या अभिनयाने भल्याभल्या अभिनेत्यांना पाणी पाजायच्या. त्या आपल्या कॉमेडीने अशोक सराफ यांनाही टक्कर द्यायच्या.
रंजना यांनी त्यांच्या कारकीर्द अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. पण त्यांची खरी गट्टी जमली ती म्हणजे अशोक सराफ यांच्याबरोबर.
गोंधळात गोंधळ, एक डाव भुताचा, सुशीला, खिचडी, बीन कामाचा नवरा, गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप, असे एकापेक्षा एक हिट आणि गाजलेले सिनेमे दिले.
त्यापैकी बिन कामाचा नवरा आणि गुपचूप गुपचूप हे दोन मास्टरपीस आजच्या घडीला कल्ट क्लासिक म्हणून आजही लक्षात आहेत.
80 च्या दशकात अशोक सराफ आणि रंजना यांची केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली होती. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा इंडस्ट्रीत जोर धरू लागल्या.
मात्र अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांच्याशी लग्न केलं आणि या चर्चाना पूर्णविराम मिळाला.
अजूनही सिनेरसिकांचं असं मानणं आहे की 1987 साली रंजनाताईंचा जो भयंकर अपघात झाला त्यानंतर त्यांच्यातलं नातं खऱ्या अर्थाने संपत गेलं.
झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रंजनाताई मुंबईहून बेंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. आणि त्या अपघातात त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले.
त्यांना कायमचे अपंगत्व आले. त्या अपघातातून रंजनाताई शेवटपर्यंत सावरू शकल्या नाहीत. त्यांचा अपघात आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी मराठी इंडस्ट्रीसाठी आणि रसिकांसाठी मोठा धक्का होता.
प्राजक्ता माळीच्या गावाचं नाव माहितीये? नुकतीच पार पडली मानाची कावड