Payal Naik
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांना मागे टाकलं
त्यांनी आपल्या विनोदी आणि गंभीर अशा प्रत्येक भूमिका अत्यंत दमदार पद्धतीने साकारल्या.
प्रत्येक कलाकाराची एक वेगळी शैली असते. अशीच मामांची एक स्टाइल मुलं तेव्हा प्रचंड कॉपी करायचे.
ती स्टाइल म्हणजे अशोक सराफ यांच्या शर्टची. त्यांच्या शर्टच्या वरची दोन बटणं कायम उघडी असतात. असं का?
आज ४ जून रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने मामांबद्दल ही खास गोष्ट जाणून घेऊया.
त्यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्या शर्टची दोन बटणं उघडी आहेत याचं कारण त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं.
त्या काळात प्रत्येक अभिनेत्याला लोक फॉलो करायचे. हिरोच्या केसांची स्टाइल, त्याचे कपडे सगळ्याची फॅशन व्हायची.
त्याच काळात दोन बटणं उघडी ठेवण्याचा ट्रेंड अशोक सराफ यांनी सेट केला होता. यामागे दोन कारणं होती. एक म्हणजे तेव्हा ही फॅशन नुकतीच आली होती.
त्यामुळे अशोक मामाही तो फॉलो करायचे आणि दुसरं म्हणजे कॉलरपर्यंत पूर्ण बटण लावल्यावर मामांना गुदमरल्यासारखं व्हायचं.
त्यामुळे वरची दोन बटणं उघडी ठेवल्याने त्यांना बरंच मोकळं वाटायचं सोबतच काम करणंही सोपं व्हायचं.
अशोक मामा हे करतायत म्हटल्यावर तेव्हा निर्माते आणि दिग्दर्शकही त्यांना काही बोलायचे नाहीत.
मात्र पुढे ही फॅशन होईल आणि ती मामांच्या नावाने ओळखली जाईल अशी कल्पनाही कुणी केली नसेल.
२४ वर्षाच्या रिंकू राजगुरूची संपत्ती किती? वाचून भुवया उंचावतील