Anushka Tapshalkar
सतराव्या शतकात हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला. जेजुरी, लोणंद, शिरवळ भागात मुघल सैन्याची छावणी होती.
स्थानिक लोककथांमध्ये मुघलांच्या हल्ल्याबद्दल सांगितली जाते. असं म्हणतात की औरंगजेबाने जेजूरीगडाच्या तटबंदीला सुरुंग लावण्याचे आदेश दिले होते.
सुरुंग लावण्यासाठी तटबंदीला छिद्रे पाडण्यात आली. असं म्हणतात की त्या छिद्रांतून हजारो भुंगे बाहेर पडल आणि त्यांनी मुघलांवर जोरदार हल्ला केला!
या हल्ल्यामुळे सैनिक वेड्यासारखे इकडे-तिकडे धावू लागले. औरंगजेबाला मल्हारी मार्तंड देवाच्या शक्तीची जाणीव झाली.
औरंगजेबाने खंडोबाची माफी मागितली अन् "सव्वा लाख रुपयांचा सोन्याचा भुंगा अर्पण करीन." असा नवस केला. आश्चर्य! भुंगे गायब झाले!
औरंगजेबाने हात रूमालाने बांधून नवस फेडला. त्याने मल्हारी मार्तंडाला “मललुखान” असे नाव दिले. म्हणूनच काही मुस्लीम बांधव आजही खंडोबाला "मललुखान" म्हणतात.
औरंगजेबाने अर्पण केलेला सोन्याचा भुंगा गडावर ठेवण्यात आला. पण 1850 मध्ये तो अचानक चोरीला गेला! ब्रिटिश गॅझेटियरमध्ये याचा उल्लेख आढळतो.
औरंगजेबावर झालेल्या भुंग्याच्या हल्ल्याबद्दल अन्य ऐतिहासिक पुरावे आढळत नाहीत पण हा चमत्कार आजही अनेक लोककथांमध्ये जिवंत आहे!