संतोष कानडे
मुघल सम्राट औरंगजेबाचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी झाला आणि मृत्यू 3 मार्च 1707 रोजी झाला. तो 88 वर्षे जगला.
औरंगजेबाने जवळपास ५० वर्षे राज्य केले, पण त्याच्या अखेरच्या काळात मराठ्यांनी त्याला मोठे आव्हान दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उदयानंतर मुघल साम्राज्याला दक्षिणेत मोठा विरोध निर्माण झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्रामुळे मुघल सैन्य अनेकदा अडचणीत यायचं.
आग्रा येथून शिवाजी महाराजांची सुटका ही औरंगजेबासाठी मोठी नामुष्की मानली जाते.
शिवाजी महाराजांनंतरही मराठ्यांचा संघर्ष थांबला नाही. औरंगजेब खऱ्या अर्थाने घाबरला तो शिवरायांना, शंभूराजांना आणि मराठ्यांना.
मराठ्यांचा प्रभाव वाढत असल्याने औरंगजेबाने आयुष्याची शेवटची अनेक वर्षे दख्खन मोहिमांमध्ये घालवली.
या मोहिमांमध्ये प्रचंड पैसा आणि सैन्य खर्च झाले, तरी त्याला पूर्ण यश मिळाले नाही.
अनेक इतिहासकारांच्या मते, औरंगजेबाला सर्वाधिक चिंता आणि डोकेदुखी मराठा शक्तीमुळेच होती.