संतोष कानडे
मुघल सम्राट औरंगजेबाचा मृत्यू ३ मार्च १७०७ रोजी अहिल्यानगरजवळील भिंगार येथील लष्करी छावणीत झाला.
औरंगजेबाची शेवटची इच्छा खुलताबाद येथे सुफी संत शेख जैनुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ दफन होण्याची होती.
भिंगार ते खुलताबाद हे अंतर सुमारे ११० ते १२० किलोमीटर आहे. सैन्याच्या ताफ्याला ते पार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागणार होता.
मार्च महिन्यातील कडक उन्हाळा आणि प्रवासाचा वेळ पाहता मृतदेह खराब होऊ नये म्हणून तत्कालीन प्रथेनुसार शव जतन प्रक्रिया करण्यात आली.
मृतदेह कुजण्यापासून रोखण्यासाठी शरीरातील सर्वात आधी खराब होणारे अंतर्गत अवयव जसे की काळीज, आतडे आणि जठर शरीराबाहेर काढण्यात आले.
हे सर्व अंतर्गत अवयव तातडीने भिंगार येथील लष्करी छावणीतील मशिदीसमोरील चौथऱ्यात पुरण्यात आले.
ज्या ठिकाणी हे अवयव दफन केले गेले, त्या जागेवर एक लहान चौथरा बांधला गेला, ज्या परिसराला आजही स्थानिक पातळीवर आलमगीर म्हणून ओळखले जाते.
अंतर्गत अवयव काढल्यानंतर उर्वरित शरीरावर सुगंधी द्रव्ये व रसायनांचा लेप लावून ते सुरक्षितपणे खुलताबादला नेण्यात आले.
यामुळेच औरंगजेबाची मुख्य आणि अधिकृत कबर केवळ खुलताबाद येथेच आहे, भिंगार येथे केवळ अंतर्गत अवयव पुरलेले आहेत.
ब्रिटिशकालीन गॅझेटिअर्स आणि इतर ग्रंथांमध्ये या घटनांचे उल्लेख आढळून येतात.