Aarti Badade
नखे कधी कापावीत, कोणत्या दिवशी कापू नयेत आणि रात्री नखे कापण्यास मनाई का केली जाते, याबाबत हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science
Sakal
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर नखे कापणे अशुभ मानले जाते. संध्याकाळचा काळ देवी लक्ष्मीच्या आगमनाशी जोडला जात असल्याने या वेळी नखे कापल्याने घरात नकारात्मकता आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science
Sakal
धार्मिक मान्यतेनुसार शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी नखे कापणे टाळावे. तसेच अमावस्या आणि नवरात्रासारख्या काही धार्मिक दिवसांमध्येही नखे कापू नयेत, असे सांगितले जाते.
Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science
Sakal
मान्यतेनुसार शनिवारी नखे कापल्याने आयुष्यावर परिणाम होतो आणि घरात दारिद्र्य येऊ शकते, असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी नखे कापणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science
Sakal
मंगळवार या दिवशी नखे कापल्याने भावंडांमध्ये वाद होणे, धैर्य कमी होणे किंवा रक्ताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, अशी मान्यता आहे. गुरुवारी नखे कापल्याने शिक्षण-ज्ञानात अडथळे येतात आणि पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो, असे शास्त्रात मानले जाते.
Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science
Sakal
धार्मिक मान्यतेनुसार सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे नखे कापण्यासाठी शुभ दिवस मानले जातात.
Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science
Sakal
आरोग्याच्या दृष्टीने पाहता आंघोळीनंतर नखे कापणे सोयीचे ठरते. पाणी आणि साबणामुळे नखे थोडी मऊ होतात, त्यामुळे ती सहज कापता येतात.
Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science
Sakal
पूर्वी घरांमध्ये पुरेसा प्रकाश उपलब्ध नसल्यामुळे रात्री नखे कापताना तुकडे नीट दिसत नसत. ते अन्नात मिसळण्याची शक्यता असल्याने स्वच्छतेच्या दृष्टीनेही ही प्रथा तयार झाली असावी, असे मानले जाते.
Avoid Cutting Nails at Night Tradition vs Science
Sakal
Heartburn Symptoms Warning sign
Sakal