Shubham Banubakode
श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो. भगवान शंकराची उपासना करताना अनेक जण मांसाहार, कांदा आणि लसूण यांचा त्याग करतात.
Why Avoid Non-Veg in Shravan
esakal
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात शरीरातील जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती कमी होते. त्यामुळे जड अन्न पचायला जास्त वेळ लागतो.
Why Avoid Non-Veg in Shravan
esakal
मांसाहारी पदार्थांमध्ये प्रथिने आणि चरबीचं प्रमाण जास्त असतं. पचनशक्ती कमी असताना हे पदार्थ खाल्ल्यास अपचन, अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
Why Avoid Non-Veg in Shravan
esakal
या ऋतूमध्ये हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वेगाने वाढतात. त्यामुळे मांस, चिकन किंवा मासे लवकर खराब होण्याची शक्यता असते.
Why Avoid Non-Veg in Shravan
esakal
योग्य तापमानात न ठेवलेले किंवा नीट न शिजवलेले मांस खाल्ल्यास फूड पॉइझनिंग, जुलाब आणि पोटाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.
Why Avoid Non-Veg in Shravan
esakal
पूर्वी फ्रिजची सुविधा नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात खराब अन्नामुळे आजार होऊ नयेत म्हणून मांसाहार टाळण्याची परंपरा रूढ झाली.
Why Avoid Non-Veg in Shravan
esakal
या दिवसांत ताज्या भाज्या, पचायला हलकं अन्न, साधा आहार आणि धान्यांचा समावेश केल्यास पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.
Why Avoid Non-Veg in Shravan
esakal
श्रावणात नॉनव्हेज टाळण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर शरीराचं आरोग्य जपण्याचं वैज्ञानिक कारणही आहे.
Why Avoid Non-Veg in Shravan
esakal
Harappan Civilization Food
esakal