सकाळ डिजिटल टीम
आपण लहानपणापासून एकत आलो आहोत की वटवाघुळ हे फक्त रात्री पाहू शकते त्यांना दिवसा दिसत नाही पण, या मागचे कारण काय आहे तुम्हाला माहित आहे का? त्यांना खरचं दिवसा दिसत नाही का आणि का दिसत नाही या मागची कारणं जाणून घ्या.
बहुतेक वटवाघूळ हे निशाचर (nocturnal) प्राणी आहेत. ते रात्रीच्या वेळीच शिकार करतात आणि सक्रिय असतात. असे म्हंटले जते.
त्यांच्या डोळ्यांमध्ये 'रॉड सेल्स' (rod cells) नावाच्या पेशी जास्त प्रमाणात असतात. या पेशी कमी प्रकाशात पाहण्यासाठी अत्यंत संवेदनशील असतात.
याच 'रॉड सेल्स'मुळे त्यांचे डोळे दिवसाच्या तीव्र प्रकाशात चकाकून जातात (dazzled). यामुळे त्यांना स्पष्ट दिसत नाही.
रात्रीच्या वेळी शिकार शोधण्यासाठी आणि दिशा ओळखण्यासाठी ते 'इकोलोकेशन' (Echolocation) या खास तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांना डोळ्यांची गरजच नसते.
वटवाघळांचे मुख्य खाद्य असलेले कीटक आणि फळे रात्रीच्या वेळीच जास्त प्रमाणात उपलब्ध असतात.
त्यांच्या शरीराची 'जैविक घडयाळ' (circadian rhythm) रात्री सक्रिय राहण्यासाठी आणि दिवसा विश्रांती घेण्यासाठी सेट झालेली असते. असे म्हंटले जाते.
त्यांच्या डोळ्यांची रचना दिवसाच्या उजेडात प्रभावीपणे काम करण्यासाठी योग्य नसते. त्यांचे डोळे कमी प्रकाशात अधिक कार्यक्षम असतात.
दिवसा आराम करून ते रात्रीच्या उड्डाणासाठी आणि शिकारीसाठी आपली ऊर्जा वाचवतात असे म्हंटले जाते.