बाळकृष्ण मधाळे
भारतीय समाजात, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये लहान मुलांच्या गळ्यात अस्वलाचा केस बांधण्याची एक जुनी परंपरा प्रचलित होती.
Why Bear Hair Tied Around Child Neck
esakal
अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या लोकश्रद्धेमागे मुलांचे संरक्षण आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचा उद्देश असल्याचे मानले जात असे.
Why Bear Hair Tied Around Child Neck
esakal
लोकमान्यतेनुसार, लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना वाईट नजर लागू नये, दृष्टदोषाचा परिणाम होऊ नये आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळावे म्हणून गळ्यात अस्वलाचा केस ताईतामध्ये बांधला जात असे.
Why Bear Hair Tied Around Child Neck
esakal
अस्वलाचा केस जवळ असल्यास वाईट शक्ती दूर राहतात, अशी अनेकांची श्रद्धा होती.
Why Bear Hair Tied Around Child Neck
esakal
याशिवाय, मुलांना वारंवार होणाऱ्या आजारांपासून बचाव व्हावा, झोपेत दचकून जाग येऊ नये आणि त्यांचे मानसिक व शारीरिक रक्षण व्हावे या उद्देशानेही हा केस ताईतामध्ये ठेवण्याची प्रथा काही भागांत होती.
Why Bear Hair Tied Around Child Neck
esakal
अस्वल हा जंगलातील अत्यंत शक्तिशाली आणि धाडसी प्राणी मानला जात असल्यामुळे त्याचा केस बाळगल्याने व्यक्तीच्या मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि धैर्य प्राप्त होते, अशीही समजूत अनेक ठिकाणी आढळून येते.
Why Bear Hair Tied Around Child Neck
esakal
मात्र, या सर्व गोष्टी केवळ पारंपरिक लोकश्रद्धांवर आधारित असून त्यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
उलट, भारतातील वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अस्वलासह कोणत्याही संरक्षित वन्य प्राण्याचे केस, नखे, कातडी किंवा इतर अवयव जवळ बाळगणे, खरेदी करणे अथवा विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे.
Why Bear Hair Tied Around Child Neck
esakal
त्यामुळे अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्याऐवजी वन्यजीवांचे संवर्धन करणे, त्यांच्या संरक्षणासाठी कायद्याचे पालन करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
Why Bear Hair Tied Around Child Neck
esakal
how many teeth does an elephant have
esakal