Elephant Teeth : हत्तीला खरोखरच 26 दात असतात? बाहेर दिसणारे 2 दात सोडून उरलेले दात कुठे असतात?

बाळकृष्ण मधाळे

पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान, बलाढ्य आणि वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. त्याचे प्रचंड शरीर, लांब सोंड, मोठे कान आणि बाहेर आलेले शुभ्र दात यामुळे तो सहज ओळखला जातो.

how many teeth does an elephant have

|

esakal

हत्तीबद्दल अनेक रंजक गोष्टी

हत्तीबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी सर्वश्रुत आहेत, मात्र त्याच्या दातांशी संबंधित एक महत्त्वाची माहिती अनेकांना माहीत नसते.

how many teeth does an elephant have

|

esakal

हत्तीचे ‘दाखवायचे’ आणि ‘खायचे’ दात वेगवेगळे

बहुतेक लोकांना हत्तीचे फक्त बाहेर दिसणारे दोन मोठे दातच दिसतात. मात्र, हे दात अन्न चावण्यासाठी वापरले जात नाहीत. खरं तर हत्तीचे ‘दाखवायचे’ आणि ‘खायचे’ दात वेगवेगळे असतात.

how many teeth does an elephant have

|

esakal

हत्तीच्या तोंडात एकूण किती दात असतात?

हत्तीच्या तोंडात एकूण 26 दात असतात. यापैकी दोन मोठे दात बाहेर स्पष्टपणे दिसतात, तर उर्वरित 24 दात अन्न चावण्यासाठी वापरले जातात.

how many teeth does an elephant have

|

esakal

सहा वेळा नवीन दात येतात

हत्तीच्या आयुष्यात हे चावण्याचे दात अनेक वेळा बदलतात. साधारणपणे सहा वेळा नवीन दात येतात. जुने दात झिजल्यानंतर त्यांच्या मागून नवीन दात पुढे सरकतात. त्यामुळे वाढत्या वयातही हत्तीला अन्न चघळण्यास अडचण येत नाही.

how many teeth does an elephant have

|

esakal

बाहेर दिसणाऱ्या दातांचे महत्त्व काय?

हत्तीचे बाहेर आलेले मोठे पांढरे दात ‘हस्तीदंत’ किंवा ‘गजदंत’ म्हणून ओळखले जातात. हे दात केवळ शोभेसाठी नसून त्यांचा अनेक महत्त्वाच्या कामांसाठी उपयोग होतो.

how many teeth does an elephant have

|

esakal

मोठ्या दातांचा काय उपयोग?

जमिनीत खोदकाम करणे, झाडांच्या फांद्या तोडणे, अन्न मिळवणे, जड वस्तू हलवणे आणि संकटाच्या वेळी स्वतःचे संरक्षण करणे यासाठी हत्ती या दातांचा प्रभावीपणे वापर करतो.

how many teeth does an elephant have

|

esakal

हत्तीचे आयुष्य किती असते?

सामान्यतः हत्ती 50 ते 70 वर्षांपर्यंत जगतो. काही हत्ती 80 वर्षांहून अधिक काळ जगल्याच्या नोंदीही आढळतात. त्याचे आरोग्य, अधिवास, आहार आणि मिळणारी देखभाल यावर त्याच्या आयुर्मानाचा मोठा प्रभाव पडतो.

how many teeth does an elephant have

|

esakal 

हत्तीच्या तोंडात एकूण 26 दात असतात

म्हणूनच, समोरून पाहिल्यावर हत्तीचे फक्त दोनच दात दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याच्या तोंडात एकूण 26 दात असतात.

how many teeth does an elephant have

|

esakal

Monsoon Forecast : हवामान खातं नाही, तर 'हा' छोटासा पक्षी सांगतोय यंदा पाऊस कसा होणार; ग्रामीण भागातील पिढ्यान् पिढ्यांचा विश्वास!

how baya bird nests predict rainfall

|

esakal

येथे क्लिक करा...