संतोष कानडे
पक्षांच्या शरीरामध्ये मूत्राशय नसते. त्यामुळे पोटात लघवी साठण्याचा प्रश्नच नाही.
पक्षी उडतात, त्यामुळे त्यांचं वजन कमी असणं आवश्यक असतं. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत पक्षांचं मूत्राशय नाहीसं झालं.
पक्षांचे मूत्रपिंड रक्तातील टाकावू पदार्थ गाळतं आणि त्याचं रुपांतर युरियाऐवजी युरिक अॅसिडमध्ये करतं. कारण युरिया बाहेर टाकण्यासाठी पाण्याची गरज असते.
युरिक Acid हे फक्षांच्या आतड्याच्या शेवटच्या भागात विष्ठेसोबत मिसळलेले असते.
पक्षांची विष्ठा पांढऱ्या आणि काळपट रंगाची असते. त्याची पांढरा भाग म्हणजे पक्षांचे मूत्र असते. ते काळसर विष्ठेसोबत बाहेर टाकले जाते.
काही पक्षांमध्ये मात्र मूत्राशयाची पिशवी असते. ज्यात शहामृग या पक्षाचा समावेश होतो.
पक्षांचं वजन कमी रहावं, पाण्याची बचत व्हावी म्हणून निसर्गाने पक्षांची लघवी आणि विष्ठा एकत्रच बाहेर टाकण्याची सोय केली आहे.
मानवी शरीरामध्ये प्रथिनांच्या पचनानंतर नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ युरिया लघवीवाटे बाहेर टाकला जातो. पक्षांमध्ये असं घडत नाही.