Aarti Badade
काळा तांदूळ आरोग्याचा खजिना आहे. प्रामुख्याने ईशान्य भारतात पिकणारे हे धान्य आता जगभर लोकप्रिय होत आहे.
Superfood Black Rice for health
Sakal
हा तांदूळ इतका मौल्यवान मानला जात असे की तो फक्त राजघराण्यातील लोकांसाठी राखीव होता. सर्वसामान्यांना तो खाण्यास मनाई होती, म्हणून याला "फॉरबिडन राईस" म्हटले जाते.
Superfood Black Rice for health
Sakal
काळ्या तांदळाचा गडद जांभळट रंग त्यात असलेल्या 'अँथोसायनिन्स' मुळे असतो. शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात आणि अल्झायमर व हृदयविकाराचा धोका टाळतात.
Superfood Black Rice for health
Sakal
पांढऱ्या भाताच्या तुलनेत काळ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रक्तात साखर हळूहळू सोडतो, ज्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि टाईप-२ मधुमेह नियंत्रणात राहतो.
Superfood Black Rice for health
Sakal
या तांदळात फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे थोडे खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे अतिसेवन टळते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मोठी मदत मिळते.
Superfood Black Rice for health
Sakal
काळा तांदूळ वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे संरक्षण करतो. तसेच यात असलेल्या ल्यूटीन आणि झिअॅक्सँथिन मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि दृष्टी तेज होते.
Superfood Black Rice for health
sakal
तांदूळ पांढऱ्या भाताप्रमाणे घाईत शिजवू नका. १. तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. २. तांदूळ आणि पाणी यांचे योग्य प्रमाण घेऊन मध्यम आचेवर ३०-३५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
Superfood Black Rice for health
Sakal
प्रथिने, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेला हा तांदूळ तुमच्या रोजच्या आहारात सामील करा. साध्या भाताला हा एक सर्वोत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे!
Superfood Black Rice for health
Sakal
Bad cholesterol treatment
Sakal