बौद्ध भिक्षू नेहमी लाल रंगाचेच कपडे का घालतात? बौद्ध धर्माशी लाल रंगाचा काय संबंध? कारण ऐकून थक्क व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

बौद्ध भिक्षू लाल वस्त्र का घालतात?

आपण अनेकदा बौद्ध भिक्षूंना लाल किंवा मरून रंगाच्या वस्त्रांमध्ये पाहतो.

Historical Origins of Buddhist Monks Robes | esakal

लाल रंग आणि बौद्ध धर्माचा काय संबंध?

बौद्ध धर्मात हा रंग केवळ पोशाख नसून त्यामागे खोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे.

Historical Origins of Buddhist Monks Robes | esakal

भगवान बुद्धांच्या काळातील परंपरा

भगवान बुद्धांच्या काळात भिक्षू नेहमी जुन्या, टाकाऊ कपड्यांपासून वस्त्रे तयार करत असत.

Historical Origins of Buddhist Monks Robes | esakal

साधेपणावर भर

ही वस्त्रे हळदीसारख्या नैसर्गिक रंगांनी रंगवली जात असत. त्या काळी रंगांच्या निवडीपेक्षा साधेपणावर भर होता.

Historical Origins of Buddhist Monks Robes | esakal

तिबेटमध्ये लाल रंग का प्रचलित झाला?

तिबेटमध्ये हळद किंवा केशरसारखे पिवळसर रंग सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे तिथल्या भिक्षूंनी स्थानिक वनस्पतींच्या मुळांपासून मिळणारा लाल किंवा तपकिरी रंग वापरण्यास सुरुवात केली. हळूहळू हा रंग तिथल्या बौद्ध भिक्षूंमध्ये परंपरेचा भाग बनला.

Historical Origins of Buddhist Monks Robes | esakal

लाल रंगाचे आध्यात्मिक महत्त्व

बौद्ध धर्मात लाल रंग धैर्य, करुणा, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो.

Historical Origins of Buddhist Monks Robes | esakal

जीवनशैलीत महत्त्वाचा दूवा

तसेच, या रंगामुळे नकारात्मक ऊर्जा आणि भावना दूर राहतात, असा भिक्षूंचा विश्वास आहे. त्यामुळे हा रंग आजही त्यांच्या जीवनशैलीत महत्त्वाचा आहे.

Historical Origins of Buddhist Monks Robes | esakal

आजही जपली जाते परंपरा

आजही जगभरातील बौद्ध भिक्षू हेच लाल किंवा मरून वस्त्र परिधान करतात. हे वस्त्र त्यांच्या साधेपणाचे, तपस्येचे आणि आध्यात्मिक शिस्तीचे प्रतीक आहे.

Historical Origins of Buddhist Monks Robes | esakal

नागपुरातील ऐतिहासिक सोहळ्याचा शेवटचा साक्षीदार; 'या' भिक्खूनं बाबासाहेबांना दिली होती बौद्ध धम्माची दीक्षा

Dr Babasaheb Ambedkar, Bhikkhu Pragyanand | esakal
येथे क्लिक करा...