सूरज यादव
उंटाच्या दुधाला पांढरं सोनं म्हणूनही ओळखलं जातं. गुजरातच्या कच्छ इथले उंट वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती खातात.
Camel Milk Health Benefits
Esakal
उंटाच्या दुधामुळे अनेक जटिल आजारही बरे होऊ शकतात असा दावा करण्यात येतो. तज्ज्ञांचं मत आहे की दूध एक परिपूर्ण असा आहार आहे.
Camel Milk Health Benefits
Esakal
भारतात ९० टक्के उंट हे गुजरात आणि राजस्थानात आढळून येतात. कोरड्या प्रदेशांमध्ये उंटाचं दूध हा मुख्य आहार आहे.
Camel Milk Health Benefits
Esakal
भारतात वर्षाला ७ हजार टन इतकं दुधाचं उत्पादन होतं. जागतिक उत्पादनाच्या तुलनेत ते ०.२ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. गेल्या ४ दशकात उंटांची संख्या ११ लाखांवरून अडीच लाखांवर आलीय.
Camel Milk Health Benefits
Esakal
दोन वशिंड असलेला बॅक्ट्रियन उंट आणि एक वशिंड असलेला ड्रोमेडरी उंट असे उंटांचे दोन प्रकार आहेत.
Camel Milk Health Benefits
Esakal
उंटांच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा व्हिटॅमीन सीचे प्रमाण ३ ते ५ पटीने जास्त असते. उंटाच्या दुधाच्या प्रोटीनची रचना मानवी दुधाशी साधर्म्य दाखवणारी असते.
Camel Milk Health Benefits
Esakal
गाई आणि म्हशीच्या दुधात बी लॅक्टोग्लोब्युलिन असते ज्यामुळे लहान मुलांना अॅलर्जी होण्याची शक्यता असते. ते उंटाच्या दुधात नसल्यानं पचायला हलके असते.
Camel Milk Health Benefits
Esakal
उंटाच्या दुधात बी१, बी२, आणि सी सारखी जीवनसत्व भरपूर असतात. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. शिवाय ते मधुमेहावरही प्रभावी ठरते.
Camel Milk Health Benefits
Esakal
उंटाच्या दुधाची किंमत प्रति लीटर २०० रुपयांपासून ९०० रुपयांपर्यंत असते. यापासून खीर, आईस्क्रीम आणि चॉकलेटसारखे पदार्थ तयार केले जातात.
Camel Milk Health Benefits
Esakal
Municipal Election One Of 12 ID Proofs
Esakal