सकाळ डिजिटल टीम
देवपूजेत कापूर का लावला जातो काय आहेत या मगची अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं जाणून घ्या.
कापूर स्वतः जळून जातो आणि कोणतीही राख मागे ठेवत नाही. हे मानवी जीवनाचे प्रतीक आहे, जिथे अहंकार (Ego) पूर्णपणे जळून देवामध्ये विलीन होतो आणि मागे काहीही उरत नाही.
कापूर जळाल्यावर त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो. हे आत्म्याने ईश्वराशी एकरूप होऊन सर्वत्र आपले अस्तित्व पसरवण्याचे प्रतीक मानले जाते.
आरतीच्या वेळी कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध आणि पवित्र होते. त्याची ज्योत ही नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, ज्यामुळे मन शांत होते.
कापूरची ज्योत ही दैवी प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि जीवनात ज्ञान व प्रकाश आणतो. असे म्हंटले जाते.
कापूर जाळल्यावर तो घन (Solid) अवस्थेतून थेट वायू (Gas) अवस्थेत जातो, ज्यामुळे अग्नी, वायू आणि आकाश या तीन तत्त्वांचा अनुभव येतो. पाणी आणि पृथ्वी या तत्त्वांचा समावेश पूजेतील इतर वस्तूंमध्ये असतो, ज्यामुळे पंचमहाभूतांचा संगम पूर्ण होतो. असे मानले जाते.
कापूरमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. तो जाळल्याने हवेतील हानिकारक जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. विशेषतः, धार्मिक स्थळे किंवा बंद ठिकाणी कापूर जाळल्याने वातावरण स्वच्छ आणि निर्जंतुक होते.
कापूरचा सुगंध श्वसनमार्गासाठी फायदेशीर असतो. त्याचा वास घेतल्याने सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास होणाऱ्या अडचणी कमी होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
कापरा मधील सकारात्मक ऊर्जा आणि त्याचा सुगंध मानसिक स्तरावर काम करतो. यामुळे मनात निर्माण होणारे नकारात्मक विचार कमी होतात आणि एक सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.