पुजा बोनकिले
झोप येत नाही यामागे बरीच कारणे आहेत. पण सर्वसाधारणपणे पुढील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
झोपेची वेळ निश्चित करून आपले Body clock किंवा शरीराच्या घड्याळ्याची काळजी घेणे; म्हणजेच ठराविक वेळीच उठणे, झोपणे, जेवणे, इत्यादी गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
झोप येत नसेल तर ताणतणावाचे नियोजन करावे.
झोप चांगली यासाठी सात्विक आहार घ्यावा.
रोज व्यायाम आणि योग केल्याने झोप चांगली येते.
चांगल्या आणि पुरेशा झोपेसाठी टीव्ही बघू नका आणि छंदांना वेळ द्या.
तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर रागावर नियंत्रण ठेवावे.
अतिश्रमाने देखील झोपेची तक्रार उद्भवू शकते.