वाहन कोणत्याही रंगाचे पण टायर्स काळेच का असतात? कारण जाणून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

टायर्स एकाच रंगाचे

आजकाल रस्त्यांवर विविध रंगांची कार आणि बाईक दिसतात. पण त्यांच्या टायर्स्कडे पाहिले तर ते सर्व काळेच असतात. कधी विचार केला आहे का?

Why Are Tyres Black ?

|

esakal

तुमच्याही मनात हा प्रश्न

स्वतःचे वाहन असले तरी टायर्स कायम काळेच दिसतात. रंगीबेरंगी वाहनांसोबत टायर्स मात्र काळेच का? चला, हे रहस्य उलगडूया.

Why Are Tyres Black ?

|

esakal

एकेकाळी टायर्स पांढरे होते!

आजच्या काळात टायर्स काळे दिसतात, पण पूर्वी ते पांढरे असायचे. रबरला स्वतःचा कोणताही विशिष्ट रंग नसतो.

Why Are Tyres Black ?

|

esakal

पांढरा रंग कसा?

पूर्वी रबरमध्ये ‘झिंक ऑक्साईड’ जास्त प्रमाणात मिसळले जायचे. हे पूर्णपणे पांढरे असल्याने टायर्स पांढरे दिसत असत. ते झीज रोखण्यासही मदत करत असे.

Why Are Tyres Black ?

|

esakal

मग रंग का बदलला?

कालांतराने टायर्स पांढऱ्याऐवजी काळे का झाले, हा मुख्य प्रश्न आहे. यामागे टिकाऊपणा हे प्रमुख कारण होते.

Why Are Tyres Black ?

|

esakal

कार्बन ब्लॅकने आणली क्रांती

२० व्या शतकाच्या सुरुवातीला शास्त्रज्ञांना कळले की ‘कार्बन ब्लॅक’ मिसळल्याने टायर्सची टिकाऊपणा खूप वाढतो. झीज रोखण्याची क्षमता लक्षणीयरीत्या सुधारते.

Why Are Tyres Black ?

|

esakal

कार्बन ब्लॅकचे फायदे

कार्बन ब्लॅकमुळे टायर्सना उष्णता सहन करण्याची क्षमता, घर्षणापासून संरक्षण, मजबूती आणि लवचिकता मिळते. त्यामुळे टायर्स जास्त काळ टिकतात.

Why Are Tyres Black ?

|

esakal

कार्बन ब्लॅक मिळणे आव्हान

सुरुवातीला पुरेसे कार्बन ब्लॅक सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक उत्पादकांनी पांढऱ्या साइडवॉल आणि काळ्या ट्रेड असलेले टायर्स तयार केले.

Why Are Tyres Black ?

|

esakal

आज टायर्स पूर्णपणे काळे का?

आता कार्बन ब्लॅक सहज आणि पुरेसे उपलब्ध आहे. ट्रेड आणि साइडवॉल दोन्हीमध्ये ते मिसळल्यामुळे आधुनिक टायर्स पूर्णपणे काळे दिसतात.

Why Are Tyres Black ?

|

esakal

काळा रंग,जास्त आयुष्य

थोडक्यात, टायर्स काळे असण्यामागे सौंदर्य नाही, तर टिकाऊपणा आणि सुरक्षितता आहे. कार्बन ब्लॅकमुळेच आपले टायर्स रस्त्यावर जास्त काळ टिकतात!

Why Are Tyres Black ?

|

esakal

सकाळी की संध्याकाळी? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Best Time To Eat Banana

|

esakal

येथे क्लिक करा