उन्हाळ्यात तुमच्याही फॅनचा स्पीड कमी होतो का?

अंकिता खाणे (Ankita Khane)

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा पारा वाढला आहे. अजून मे महिना सुरू झाला नाही, तेवढ्यातच कित्येक ठिकाणी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

अशामध्ये घरा-घरांमधील पंखे फुल स्पीडने फिरताना दिसत आहेत. मात्र कित्येकांची अशी तक्रार असते, की घरातील पंखे नेमके उन्हाळ्यातच हळू चालतात. तुमच्याही घरी हीच समस्या असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

उन्हाळ्यात फॅनचा स्पीड कमी होण्याची दोन मुख्य कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे व्होल्टेज. उन्हाळ्यात वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे कित्येक वेळा व्होल्टेज कमी होतं. यामुळे फॅनचा वेगही कमी होतो.

याचं दुसरं कारण म्हणजे, फॅनचा कन्डेन्सर कमकुमवत होणे. हिवाळ्यामध्ये फॅनचा वापर अगदी कमी होत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतं.

त्यामुळे फॅनचा कन्डेन्सर वीक किंवा खराब झालेला सहसा लक्षात येत नाही. कन्डेन्सर बदलून नवीन टाकल्यास फॅनचा स्पीड पुन्हा पहिल्यासारखा होईल.

काय करता येईल उपाय?

फॅनचा कन्डेन्सर बदलणे हा मुख्य उपाय आहे. तुम्ही स्वतः देखील मार्केटमधून नवीन कन्डेन्सर घेऊन येऊ शकता, आणि बदलू शकता.

अर्थात, तुम्हाला त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंगबाबत साधारण माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही एखाद्या मेकॅनिकच्या मदतीने देखील कन्डेन्सर बदलून घेऊ शकता.

याव्यतिरिक्त दुसरा उपाय म्हणजे तुम्ही घराच्या मेन सप्लायमध्ये स्टेबलायझर बसवू शकता. यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या विजेचं व्होल्टेज नियमित होईल, आणि फॅनला योग्य प्रकारे वीजपुरवठा मिळेल.

यामुळे फॅनचं स्पीड कमी-जास्त न होता एकसारखं राहील. या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील जर तुमच्या घरातील पंखा नीट काम करत नसेल, तर मेकॅनिकला बोलवून त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea