बाळकृष्ण मधाळे
विमान प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची काटेकोर तपासणी केली जाते.
Coconut Not Allowed in Flight
esakal
या तपासणीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने काही वस्तू काढून घेतल्या जातात. प्रवाशांची आणि विमानाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे नियम लागू केलेले असतात.
Coconut Not Allowed in Flight
esakal
विमानात नेण्यास मनाई असलेल्या वस्तूंमध्ये नारळाचाही समावेश होतो. अनेकांना याचे आश्चर्य वाटते; मात्र यामागे महत्त्वाचे कारण आहे.
Coconut Not Allowed in Flight
esakal
वाळलेला नारळ ज्वलनशील (लवकर पेट घेणारा) असतो. त्यामुळे आग लागण्याचा धोका संभवतो. म्हणूनच, वाळलेले तसेच संपूर्ण नारळ विमानात नेण्यास परवानगी दिली जात नाही. चेक-इन प्रक्रियेदरम्यान असे नारळ आढळल्यास ते जप्त केले जातात.
Coconut Not Allowed in Flight
esakal
विमान कंपन्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतात. त्यामुळे कोणतीही ज्वलनशील किंवा धोकादायक वस्तू विमानात नेण्यास कडक मनाई असते. यामध्ये काही प्रकारचे अल्कोहोल, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ तसेच अंमली पदार्थांचा समावेश होतो.
Coconut Not Allowed in Flight
esakal
याशिवाय पेपर स्प्रे, काठ्या, धारदार वस्तू, पॉवर बँक (विशेषतः चेक-इन बॅगेत), रेझर, ब्लेड, नेल कटर, नेल फाइलर, लाईटर यांसारख्या वस्तूंवरही निर्बंध असतात.
Coconut Not Allowed in Flight
esakal
तथापि, प्रत्येक विमान कंपनीचे आणि प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे असू शकतात.
Coconut Not Allowed in Flight
esakal
प्रवासाचा कालावधी, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाण यानुसारही नियम बदलू शकतात. त्यामुळे विमान प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीचे अधिकृत नियम तपासणे आवश्यक आहे.
Coconut Not Allowed in Flight
esakal
God Idols in Car
esakal