Aarti Badade
रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरणे ही एक आरोग्यदायी सवय आहे. यामुळे केवळ केसच नव्हे, तर मनही शांत होते.
दररोज रात्री केस विंचरल्याने केसांमधील गुंता सुटतो आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
कंघी केल्याने टाळूला सौम्य मालिश मिळते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांची वाढ चांगली होते.
केस विंचरण्यामुळे शरीर आणि मन शांत होते. यामुळे झोप लागण्यास मदत होते.
दिवसभरात टाळूवर साचलेली धूळ, घाम आणि घाण निघून जाते, टाळू स्वच्छ राहतो.
केस विंचरणे म्हणजे एक प्रकारचा रिलॅक्सिंग रिच्युअल – यामुळे तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.
नियमित विंचरण्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केसांमध्ये नैसर्गिक चमक येते.
टाळूवरील मृत पेशी, अतिरिक्त तेल आणि कोंडा कमी होतो – ज्यामुळे टाळू निरोगी राहतो.