Aarti Badade
रडल्यामुळे मेंदूमधून ल्युसीन एन्केफॅलिन हे केमिकल स्रवते, जे नैराश्य आणि तणाव कमी करते.
भावना व्यक्त झाल्यामुळे मनावरचा भार कमी होतो आणि तुमचं मन अधिक स्थिर होतं.
रडल्याने साठून राहिलेल्या भावना व्यक्त होतात आणि मानसिक संतुलन राखलं जातं.
रडल्यावर शरीर शांतावते, सुस्ती येते, आणि विचार अधिक स्पष्ट होतात.
ही प्रणाली तुम्हाला "सर्व काही ठीक आहे" असा संदेश देते आणि शरीरात शांतता निर्माण करते.
दु:ख, राग, निराशा यासारख्या भावना रडण्याच्या माध्यमातून बाहेर पडतात, ज्यामुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
रडणे हे भावनिक ताकदीचे लक्षण असू शकते. भावना व्यक्त करणे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.
वारंवार रडू वाटल्यास किंवा ताण जाणवत असल्यास, मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या.