सकाळ डिजिटल टीम
कांदा कापताना नेहेमी डोळ्यातुन पाणी येते पण तुम्ही कधी विचार केला आहे का कांदा कापताना डोळ्यातुन पाणी का येते. जाणून घ्या यामागची कारणं
onion
sakal
कांद्यामध्ये 'अमिनो अॅसिड सल्फॉक्साईड्स' नावाचे घटक असतात. जेव्हा आपण कांदा कापतो, तेव्हा कांद्याच्या पेशी फुटतात.
onion
sakal
पेशी फुटल्यामुळे त्यातील 'लॅक्रिमेटरी फॅक्टर सिंथेस' (Lachrymatory-factor synthase) नावाचे एन्झाईम बाहेर पडतात आणि अमिनो अॅसिडशी प्रक्रिया करतात.
onion
sakal
या प्रक्रियेतून 'सल्फेनिक ॲसिड' तयार होते, जे अत्यंत अस्थिर असते. सल्फेनिक ॲसिडचे रूपांतर लवकरच 'सिन-प्रोपॅनथियल-एस-ऑक्साइड' (Syn-propanethial-S-oxide) नावाच्या वायूमध्ये होते.
onion
sakal
हा वायू अतिशय हलका आणि बाष्पशील असतो, त्यामुळे तो हवेत पसरून थेट आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो.
onion
sakal
जेव्हा हा वायू डोळ्यांतील ओलाव्याच्या (पाण्याच्या) संपर्कात येतो, तेव्हा त्याचे रूपांतर अत्यंत सौम्य अशा 'सल्फ्यूरिक ॲसिड'मध्ये होते.
onion
sakal
सल्फ्यूरिक ॲसिडमुळे डोळ्यांच्या मज्जातंतूंना त्रास होतो आणि जळजळ होऊ लागते.
onion
sakal
ही जळजळ थांबवण्यासाठी आणि ते ॲसिड डोळ्यांतून बाहेर धुवून टाकण्यासाठी आपला मेंदू अश्रू ग्रंथींना (Lacrimal glands) पाणी सोडण्याचा संदेश देतो.
onion
sakal
म्हणूनच, डोळ्यात आलेले पाणी हे प्रत्यक्षात डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेले असते.
onion
sakal
custard apple
Sakal