Apurva Kulkarni
काल भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप मानले जातात. ते काळाचे रक्षण करणारे देव म्हणून ओळखले जातात.
काल भैरवांना प्रसन्न करण्यासाठी रोज दारुचा नैवेद्य चढवण्याची परंपरा आहे. ही दारु भक्त भावपूर्वक अर्पण करतात.
उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं काल भैरव मंदिरासह उज्जैनमधील कालभैरव मंदिरात दारुचा नैवेद्य दाखवला जातो.
मंदिराबाहेरच एक खास दुकान असते जिथून भक्त पवित्र नैवेद्य म्हणून लहान दारुच्या बाटल्या विकत घेतात.
शैव संप्रदायात काल भैरवाची पूजा रक्षणकर्ता देव म्हणून केली जाते. त्यांच्यापुढे मास, मदिरा आणि लसूण- कांदा अर्पण करणे सामान्य मानले जाते.
जी दारु नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते ती नंतर भक्त प्रसाद म्हणून सोबत नेतात.
भाविक काल भैरवाची ही परंपरा अत्यंत श्रद्धेने पाळतात आणि दररोज दर्शनासाठी गर्दी करतात.