Anuradha Vipat
आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे नीलम शिर्के.
अभिनेत्री नीलम इंडस्ट्रीत टॉपला असताना अचानक गायब झाली.
यामागचं नेमकं कारण काय? ती सध्या काय करते? याचा खुलासा नीलमने स्वतः एका मुलाखतीमधून केला आहे.
नीलम म्हणाली, मी अभिनय क्षेत्रापासून लांब नाही गेले. अभिनेत्री म्हणून नक्कीच पूर्णपणे वीआरएस घेतली आहे. प्रोडक्शन चालू आहे. प्रोडक्शनचे कार्यक्रम सुरू आहेत.
पुढे नीलम म्हणाली ,काही माहितीपूर्ण कार्यक्रम आम्ही शूट करत असतो. त्याच्यावरती पूर्ण टीम काम करतेय. मी सध्या प्रुफ एडिटर म्हणून अस्मी प्रोडक्शन असं छान एंटरटेनमेंट कंपनी चालवत आहे
पुढे नीलम म्हणाली , टॉपला गेल्यावरती लोकांना असं परत वाटलं पाहिजे, ही अभिनेत्री परत कधी येणार, त्यामुळे ती वीआरएस घेतली गेली.
पुढे नीलम म्हणाली ,अभिनय आणि रंगमंचापासूनचं नातं कलाकाराने कितीही तोडायचा प्रयत्न केला तरीही तोडू शकत नाही.