Anuradha Vipat
करीना कपूर खान आणि आमिर खान यांनी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे
लाल सिंग चड्ढा हा ‘फॉरेस्ट गंप’ या इंग्रजी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
हा चित्रपट प्रदर्शित तर झाला पण फ्लॉप ठरला होता.
त्यानंतर करीनाची आमिरशी भेट झाली, तेव्हा आमिर मजेत तिला म्हणाला होता की, आपला पिक्चर तर चालला नाही, पण तू माझ्याशी बोलशील ना ग ?
त्यावर करीनाने त्याला थेट उत्तर दिलं होतं की, बॉक्स ऑफीसवर पिक्चर कसा चालतो त्यावर मी लोकांशी नातं जोडत नाही रे.
कोविड -19 च्या वेळेस या चित्रपटाचे शूटिंग झाले होते
हा चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खानला खूप वाईट वाटलं होतं