Anuradha Vipat
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा थाटामाटात पार पडला.
अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पही या सोहळ्याला उपस्थित होती.
या सोहळ्यात इवांकाने अनेक फोटोज काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले.
इवांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका मोठ्या हत्तीसमोर उभी राहिलेली दिसत आहे. या हत्तीच्या डोक्यावर सजावट केलेलीसुद्धा दिसत आहे.
इवांकाचा हा फोटो पाहून अभिनेता अर्शद वारसीची पत्नी मारिया गोरेट्टी हिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात मारिया म्हणाली, “अंबानींच्या सेलिब्रेशनमधील हा फोटो पाहून मी हैराण झाले. हे कोणत्याही प्राण्याबाबत घडले नाही पाहिजे.
मोठ मोठ्या आवाजात आणि लोकांच्या गराळ्यात या हत्तीला मधोमध उभं केलं आहे. हत्तीचा उपयोग फक्त कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी केला गेलाय.” मारिया गोरेट्टीची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.