सूरज यादव
प्राचीन रोममध्ये मार्चपासून वर्ष सुरू होत होतं. सुरुवातीच्या रोमन कॅलेंडरमध्ये दहा महिन्यांची परंपरा असल्याचं सांगितलं जातं.
New Year
Esakal
मार्च महिन्याचं नाव युद्धदेवता मार्स यांच्या नावावरून पडलं. हा काळ युद्ध आणि शेतीच्या कामांच्या सुरुवातीचा होता.
New Year
Esakal
रोमन परंपरेनुसार नुमा पॉम्पिलियस याने जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने कॅलेंडरमध्ये जोडले.
New Year
Esakal
जानेवारीचं नाव जॅनस या रोमन देवतेवरून पडलं. ही देवता सुरुवात आणि प्रवेशद्वारांची प्रतीक मानली जाते.
New Year
Esakal
इ.स.पूर्व १५३ मध्ये रोमन अधिकाऱ्यांचा कार्यकाळ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
New Year
Esakal
मार्चमध्ये युद्धमोहिमा सुरू होण्यापूर्वी अधिकाऱ्यांना प्रशासनाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हा यामागचा उद्देश होता.
New Year
Esakal
ज्युलियस सीझरने इ.स.पूर्व ४६ मध्ये कॅलेंडरमध्ये सुधारणा केली. त्यानंतर ज्युलियन कॅलेंडर लागू झालं.
New Year
Esakal
पुढे ग्रेगोरियन कॅलेंडर जगभर प्रचलित झालं. त्यामुळे आजही एक जानेवारीला नववर्ष साजरं केलं जातं.
New Year
Esakal
Padmadurg Fort History
Sakal