Sandip Kapde
१९२१ साली युवराज हरि सिंह यांना युरोप टूरवर पाठवण्यात आलं.
त्यावेळी त्यांचं वय फक्त २६ वर्षं होतं, आणि त्यांनी आधीच दोन विवाह केले होते.
इंग्लंडमध्ये त्यांनी उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलं होतं.
लंडनमध्ये त्यांची ओळख एका विधवा महिलेबरोबर करून देण्यात आली.
ती विधवा अतिशय श्रीमंत घराण्यातील असल्याचं सांगण्यात आलं.
खरेतर, ही एक मोठा कट होता, जी एका वकिलाने रचली होती.
या कटात इंग्रजी अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.
महाराजा हरि सिंह त्या महिलेच्या जाळ्यात अडकले.
एक दिवस ते दोघं सेवॉय हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळले.
तिथे अचानकच महिलेचा "पती" दाखल झाला आणि सगळा प्रकार उघड झाला.
या घटनेनंतर हरिसिंह यांना ब्लॅकमेल केलं जाऊ लागलं.
त्यांच्याकडून तब्बल ४५ लाख रुपये उकळले गेले.
एवढं करूनही ब्लॅकमेलिंग थांबलं नाही.
शेवटी त्या महिलेचा खरा नवरा समोर आला आणि कोर्टात गेला.
न्यायालयात हरिसिंह यांना "मिस्टर ए" म्हणून ओळखण्यात आलं.
इंग्लंडपासून अमेरिकेपर्यंत त्यांच्या स्कँडलची चर्चा झाली.
ही बदनामी टाळण्यासाठी ते लगेच काश्मीरला परतले.
परतल्यावर राजे प्रतापसिंह यांनी त्यांना चांगलंच झापलं.
शिक्षा म्हणून त्यांनी हरिसिंह यांना मिशी काढण्यास सांगितलं.
एक इंग्लिश बाई आणि तिचं मोहक रूप एका महाराजाला इतकं महागात पडलं की त्याला आपली मिशीही गमवावी लागली!