1998मध्ये नासाने सुनीता विल्यम्सची निवड का केली?

सकाळ वृत्तसेवा

करिअरची सुरुवात

सुनीता यांच्या करिअरची सुरुवात यूएस नेव्हीमधून झाली. 1987 मध्ये त्यांनी हेलिकॉप्टर पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेतले.

sunita williams background | esakal

आखाती युद्धात भाग

त्यांनी आखाती युद्धात भाग घेतला होता, इराकमध्ये नो-फ्लाय झोन लागू करण्यात मदत केली आणि मियामीला हरिकेन अँड्र्यू रिलीफ मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

Sunita Williams | Esakal

नासाचे लक्ष वेधून घेतले

त्यांची कठीण परिस्थितीत काम करण्याची क्षमता याने नासाचे लक्ष वेधून घेतले. आणि त्यानंतर जून 1998 मध्ये नासाने सुनीता यांची निवड केली.

Sunita Williams | Esakal

निवड करण्यामागे अनेक कारणे

नासामध्ये अंतराळवीर बनणे सोपे नाही. सुनीता विल्यम्स यांची निवड करण्यामागे अनेक कारणे होती.

Sunita Williams | Sakal

अनेक महत्त्वाच्या मोहिमा पूर्ण

सर्वप्रथम सुनीता यांनी नौदलात पायलट असताना अनेक महत्त्वाच्या मोहिमा पूर्ण केल्या होत्या. पदव्युत्तर पदवी आणि तांत्रिक क्षमतांमुळे त्या नासासाठी योग्य उमेदवार बनल्या.

Sunita Williams | Sakal

शारीरिक आणि मानसिक क्षमता

अंतराळ मोहिमांसाठी शारीरिक आणि मानसिक क्षमता देखील खूप महत्त्वाची आहे, ज्यामध्ये त्या अतिशय उत्कृष्ट होत्या.

Sunita Williams | Sakal

रोबोटिक्स शाखेत काम

NASA मध्ये निवड झाल्यानंतर, त्यांनी रोबोटिक्स शाखेत काम केले आणि ISS च्या रोबोटिक आर्ममध्ये संशोधन केले.

Sunita Williams | Esakal

NEEMO2 मिशनमध्ये भाग

त्यांनी NASA च्या NEEMO2 मिशनमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये त्यांनी पाण्याखाली नऊ दिवस वास्तव्य केले आणि वैज्ञानिक संशोधन केले. यावरून त्या कठीण परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात हे सिद्ध झाले.

Sunita Williams | Esakal

कल्पना चावलाचा मृत्यू कसा झाला? लँडिंगच्या १६ मिनिटं आधी दुर्घटना

Kalpana Chawala | Esakal
येथे क्लिक करा