Aarti Badade
भारतावर सत्ता गाजवणाऱ्या बाबरने ‘सुलतान’ ही अरबी पदवी नाकारून ‘बादशाह’ ही फारसी पदवी का निवडली?
खलिफतची सुरुवात मदीना येथे झाली. नंतर ती दमास्कस (सिरिया) आणि मग बगदादमध्ये स्थिर झाली.
१३व्या शतकात मोंगोलांनी बगदाद उद्ध्वस्त केल्याने खलिफत कमजोर झाली, आणि अरबी राजसत्तेचा प्रभाव घटला.
१३९९ मध्ये तुर्क-मंगोल वंशीय योद्धा तैमूर लंगने दिल्ली लुटली. याने इस्लामी सत्ताक्रमात मोठा बदल घडवून आणला.
बाबर हा तैमूरचा वंशज (पित्याच्या बाजूने) आणि चंगेज खानशी संबंधित (आईच्या बाजूने) होता.
बाबर फारसी साहित्य, संगीत, वास्तुकला आणि बागबगिच्यांचा चाहता होता. चारबाग शैली भारतात त्याने आणली.
बाबरने ‘सुलतान’ ही अरबी पदवी टाळून ‘बादशाह’ (शासक) व ‘शहंशाह’ (राजांचा राजा) या फारसी पदव्या स्वीकारल्या.
संपूर्ण मुघल साम्राज्याने फारसी भाषा, परंपरा व प्रशासन स्वीकारले..
‘बादशाह’ ही पदवी ही केवळ सत्ता नव्हे, तर सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचे प्रतिक होते – बाबरने तीच निवडली.