आकाशात वाहतूकच नसते, मग विमानांना हॉर्न का असतात? जाणून घ्या कारण...

Mansi Khambe

विमान हॉर्न

आकाशात वाहतूक किंवा पादचारी नसतानाही लाखो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानांना हॉर्नची गरज का भासते? हा प्रश्न जितका विचित्र आहे, तितकेच त्याचे उत्तरही रंजक आहे.

Airplane Horn

|

ESakal

विमानांची वर्दळ

हे खरं आहे की जेव्हा आकाशात विमानांची वर्दळ नसते, तेव्हा विमानाच्या हॉर्नचा काय उपयोग? पण विमानाच्या हॉर्नचे कार्य आपल्या कार किंवा बसमधील हॉर्नसारखे नसते.

Airplane Horn

|

ESakal

उद्देश

आकाशात त्याचा कधीही वापर केला जात नाही. या हॉर्नचा खरा उद्देश तेव्हा सुरू होतो, जेव्हा विमान जमिनीवर असते, म्हणजेच विमानतळाच्या धावपट्टीवर किंवा हँगरमध्ये.

Airplane Horn

|

ESakal

संवाद साधन

हे एक विशेष संवाद साधन आहे, जे केवळ जमिनीवरील कर्मचारी आणि वैमानिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी वापरले जाते.

Airplane Horn

|

ESakal

GND

विमानाच्या कॉकपिटमधील कंट्रोल पॅनलवर 'GND' असे लिहिलेले एक विशेष बटण असते, ज्याचा अर्थ 'ग्राउंड' असा होतो.

Airplane Horn

|

ESakal

संपर्क

जेव्हा वैमानिकाला जमिनीवरील इंजिनिअर, मेकॅनिक किंवा ग्राउंड क्रूशी संपर्क साधायचा असतो, तेव्हा ते हे बटण दाबतात.

Airplane Horn

|

ESakal

लाउडस्पीकर

बटण दाबल्यावर, विमानाच्या पुढच्या चाकांजवळ बसवलेल्या लाउडस्पीकरसारख्या उपकरणातून मोठा आवाज येतो. हा आवाज ऐकून, क्रूला समजते की वैमानिकाला त्यांना काहीतरी सांगायचे आहे.

Airplane Horn

|

ESakal

धावपट्टी

विमानांच्या मोठ्या इंजिनांमुळे विमानतळाच्या धावपट्टीवर नेहमीच गोंगाट असतो. तिथे काम करणारे सर्व अभियंते आणि जमिनीवरील कर्मचारी आपल्या कानांच्या संरक्षणासाठी जाड हेडफोन घालतात.

Airplane Horn

|

ESakal

मेकॅनिक

अशा प्रचंड गोंगाटात, जर कॉकपिटमधील वैमानिकाला खाली उभ्या असलेल्या मेकॅनिकला काही महत्त्वाचे सांगायचे असेल, तर सामान्य आवाजात ओरडणे निरर्थक ठरते.

Airplane Horn

|

ESakal

हॉर्नचा आवाज

अशा वातावरणात, मेकॅनिकच्या हॉर्नचा आवाज इतका तीव्र आणि मोठा असतो की, हेडफोन घातलेले असूनही कामगार लगेच सावध होतात.

Airplane Horn

|

ESakal

अलार्म

हा विमानाचा हॉर्न केवळ पायलटने दाबल्यावरच वाजत नाही; तर त्यात एक स्वयंचलित प्रगत अलार्म प्रणालीदेखील आहे. जेव्हा विमान जमिनीवर थांबलेले असते.

Airplane Horn

|

ESakal

तांत्रिक समस्या

कोणत्याही अंतर्गत प्रणालीमध्ये किंवा इंजिनमध्ये तांत्रिक समस्या असते, किंवा आगीचा धोका असतो, तेव्हा हा हॉर्न आपोआप वाजतो.

Airplane Horn

|

ESakal

समस्या

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विमानामधील वेगवेगळ्या बिघाडांसाठी या हॉर्नमध्ये वेगवेगळे आवाज आणि सूर आहेत, ज्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या अभियंत्यांना समस्या त्वरित ओळखता येते.

Airplane Horn

|

ESakal

प्रणाली

ही संपूर्ण प्रणाली केवळ जमिनीवर वापरण्यासाठी तयार केली आहे. विमान धावपट्टीवरून उड्डाण करताच, ही प्रणाली पूर्णपणे निष्क्रिय केली जाते, म्हणजेच ती बंद केली जाते.

Airplane Horn

|

ESakal

रेडिओ कम्युनिकेशन

यामुळे उड्डाणादरम्यान बटण चुकून दाबले जात नाही. वैमानिक किंवा कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित होत नाही. हवेत वैमानिक इतर विमानांशी संवाद साधण्यासाठी रेडिओ कम्युनिकेशन आणि रडारचा वापर करतात.

Airplane Horn

|

ESakal

एका बँक खात्यातून एका वेळी किती पैसे पाठवू शकता? जाणून घ्या नवा नियम...

Money Transfer limit

|

ESakal

येथे क्लिक करा