Aarti Badade
सफरचंदात असतात फायबर, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, पोटॅशियम, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
सफरचंद कापल्यावर काही वेळातच तपकिरी दिसू लागते. हे का घडतं?
सफरचंदात पॉलीफेनॉल ऑक्सिडेस (PPO) नावाचं एंजाइम असतं, जे कापल्यावर सक्रिय होतं.
सफरचंद कापल्यावर पेशी तुटतात आणि PPO एंजाइम हवेतील ऑक्सिजनशी संपर्कात येते.
ही प्रतिक्रिया तपकिरी रंग तयार करणाऱ्या मेलेनिनला जन्म देते – जसे आपल्या त्वचेत असते.
तपकिरी झालेलं सफरचंद अजूनही खाण्यास योग्य असतं. फक्त त्याची रंग व चव किंचित बदललेली असते.
लिंबाचा रस, मिठाचं पाणी, थंड पाणी वापरा किंवा हवाबंद डब्यात ठेवा.
हा रंग बदल एक रासायनिक प्रक्रिया आहे — काही घाबरण्यासारखं नाही!