पक्षी म्हातारे होतात का? त्यांचे मृतदेह कधीच का दिसत नाहीत?

संतोष कानडे

पक्षी

माणसांप्रमाणेच पक्षीही म्हातारे होतात आणि त्यांच्या शरीराची कार्यक्षमता हळूहळू कमी होते.

आयुष्य

प्रत्येक पक्ष्याचे आयुष्य वेगवेगळे असते. काही पक्षी काही वर्षे, तर काही अनेक दशके जगतात.

उडण्याची क्षमता

वय वाढल्यामुळे पक्ष्यांची उडण्याची क्षमता, ताकद आणि हालचाल कमी होऊ शकते.

नैसर्गिक मृत्यू

पक्ष्यांचाही नैसर्गिक मृत्यू होतो; मात्र त्यांचे मृतदेह आपल्याला क्वचितच दिसतात.

अशक्त पक्षी

याचे एक कारण म्हणजे आजारी किंवा अशक्त पक्षी अनेकदा शांत आणि लपलेल्या जागी जातात.

पक्ष्यांचा मृत्यू

काही पक्ष्यांचा मृत्यू झाडांच्या दाट फांद्यांमध्ये किंवा घरट्यांमध्ये होतो.

मांजर

जमिनीवर मृत पक्षी पडल्यास मांजर, कुत्रे आणि इतर प्राणी त्यांना खाऊ शकतात.

कीटक

मुंग्या, कीटक आणि सूक्ष्मजीवांमुळेही मृतदेहाचे विघटन होते.

मृतदेह

जंगल, झुडपे आणि निर्जन भागांत पक्ष्यांचे मृतदेह पडलेले असू शकतात; मात्र ते आपल्या नजरेस पडत नाहीत.

म्हातारे

त्यामुळे पक्षी म्हातारे होत नाहीत किंवा त्यांचा मृत्यू होत नाही, असे नाही. त्यांचा मृत्यू होतो; फक्त तो आपल्या नजरेपासून दूर असतो.

मुघलांच्या शयनकक्षात असायच्या 'या' खास वस्तू

<strong>येथे क्लिक करा</strong>