सकाळ डिजिटल टीम
दाताच्या बाहेरील भागावर जेव्हा जंतू अन्नकणांबरोबर राहतात तेव्हा ऍसिड तयार होते, ज्यामुळे दात पोखरायला लागतो यालाच दाताला कीड लागणे म्हणतात.
दात स्वच्छ न ठेवल्यास तोंडात जंतू वाढतात. ते साखर, स्टार्च यावर ऍसिड बनवतात, जे इनेमलवर हल्ला करतात आणि कीड सुरु होते.
जास्त गोड खाणे, वारंवार स्नॅक्स घेणे, झोपण्यापूर्वी ब्रश न करणे या सवयी कीड वाढवतात.
दातात काळा ठिपका, गोड किंवा थंड लागल्यावर वेदना, अन्न अडकणे ही सुरुवातीची लक्षणं आहेत.
मुलं गोड खूप खातात आणि ब्रश नीट करत नाहीत. त्यामुळे त्यांना कीड लवकर होते.
डेंटिस्टकडे तपासणी करून फिलिंग, रूट कॅनॉल, किंवा इतर उपचार घेणे आवश्यक आहे.
दररोज सकाळ संध्याकाळ ब्रश करा, फ्लॉस वापरा, कमी गोड खा आणि दर ६ महिन्यांनी डेंटिस्टकडे जा.
दात टिकवायचे असतील तर स्वच्छता, आहार आणि वेळेवर तपासणी या गोष्टींचं काटेकोर पालन करा.