चिप्सच्या पाकिटात हवा जास्त का असते? कधी केलायं याचा विचार

Mansi Khambe

चिप्स

लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना चिप्स खाणे आवडते. मात्र, जेव्हा दुकानातून चिप्सचे पाकीट विकत घेऊन ते उघडले जाते, तेव्हा त्यात चिप्स कमी आणि हवा जास्त असल्याचे दिसून येते.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

अर्धे रिकामे पाकीट

चिप्सचे अर्धे रिकामे पाकीट पाहून, अनेक लोकांचा असे वाटते की, चिप्स बनवणारी कंपनी ग्राहकांची फसवणूक करत आहे. जर तुमचाही असाच समाज असेल तर, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

कंपनी

चिप्स बनवणारी कंपनी पाकिटातील रिकामी जागा, चिप्सना दीर्घकाळ कुरकुरीत आणि सुरक्षित ठेवते. तसेच त्यांना खराब होण्यापासून वाचवते. जर चिप्सचे पॅकेट पूर्णपणे भरलेले असेल, तर थोड्याशा दाबामुळेही बहुतेक चिप्सचे तुकडे होऊ शकतात.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

विशेष वायू

पॅकेटमध्ये हवा नसते, त्यात एक विशेष वायू असतो. जे नायट्रोजन नावाच्या एका विशेष वायूने ​​भरलेले असते. तो रंगहीन (पारदर्शक) आणि गंधहीन असतो. त्यामुळे, तो अन्नासोबत सहजपणे रासायनिक अभिक्रिया करत नाही.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

सुरक्षा

जर पॅकेटमध्ये ऑक्सिजन असता, तर चिप्समधील तेल लवकर खराब झाले असते, ज्यामुळे चिप्सची चव, सुगंध आणि कुरकुरीतपणा नाहीसा होऊ शकला असता.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

ताजेपणा

नायट्रोजन वायू चिप्सना जास्त काळ ताजे ठेवतो. तसेच, तो चिप्स तुटण्यापासून वाचवण्यासही मदत करतो.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

पॅकेजिंगची रचना

पॅकेजिंगची रचना चिप्सच्या संख्येवर नसून चिप्स सुरक्षित ठेवण्यासाठी, मशीनद्वारे सहज पॅकिंग करता यावे, वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान टाळता यावे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चिप्ससाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी केली जाते.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

वजनाने विक्री

अनेक लोकांना वाटते की पाकिटाचा मोठा आकार म्हणजे त्यात जास्त चिप्स असतील. मात्र कंपन्या चिप्स वजनाने विकतात. म्हणजेच जर पाकिटावर ५० ग्रॅम लिहिले असेल, तर त्यात ५० ग्रॅम चिप्स असतील.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

फसवणूक

जरी मोठ्या पॅकेजमुळे त्यात जास्त चिप्स असल्याचा भास होत असला तरी, आतील रिकामी जागा ग्राहकांना फसवण्याच्या उद्देशाने नसते. कंपन्या ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न करत नाहीत.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

हेतू

पॅकेज रिकामे ठेवण्यामागे कंपनीचा हेतू चिप्स अधिक ताजे ठेवणे, त्यांचा कुरकुरीतपणा टिकवून ठेवणे, वाहतुकीदरम्यान ते तुटण्यापासून वाचवणे आणि त्यांची टिकवण क्षमता वाढवणे हा असतो.

Why Chips Packet Are Half Empty

|

ESakal

लाल वीट, फ्लाय ॲश, की काँक्रीट ब्लॉक? घर बांधताना कोणती वीट सर्वोत्तम?

Best Brick For Constructing House

|

ESakal

येथे क्लिक करा