सकाळ वृत्तसेवा
आषाढी एकादशी संपली, पण वारी अजून संपत नाही! शिळ्या विठोबाचे दर्शन आणि माघारी वारी म्हणजे काय, ते जाणून घ्या.
आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी विठोबाचे 'शिळे दर्शन' घेतले जाते. पण 'शिळा' या शब्दामागे एक सुंदर भक्तिभाव आहे.
जुने लोक म्हणतात, विठोबा कधीच शिळा होत नाही. हा शब्द केवळ भक्तांच्या प्रेमाचा भाव आहे.
वारकरी देवाला आपले सर्वस्व अर्पण करतात, अगदी शिळी भाकरीसुद्धा. विठोबाला प्रेमाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते.
एकादशीला लाखो भक्तांना भेटलेला विठोबा दुसऱ्या दिवशी 'दमलेला' असतो. त्यासाठी त्याला पाणी, दूध आणि तुळशीची माळ अर्पण केली जाते.
वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणे नाही, तर गुरु पौर्णिमेनंतर परतीचा प्रवास म्हणजेच माघारी वारी होय!
अनेकांना वाटते की वारी आषाढीला संपते. पण खरेतर ती काल्याच्या प्रसादाने – गुरु पौर्णिमेला पूर्ण होते.
पंढरपूरहून परतीची वारी ८-१० दिवसांत पूर्ण होते. ही वारी अधिक कठीण असते, म्हणूनच तिला वैराग्याची वारी असे म्हणतात.
वारकरी पहाटे २-२.३० वाजता उठून चालायला सुरुवात करतात. दिवसाला ३०-३५ किमी अंतर पार करून ते पुन्हा देहू-आळंदीला परततात.
संतांची पालखी पुन्हा गावात पोहोचते. तिची हजेरी होते, नारळ फोडले जातात. तेव्हा वारीचे पावित्र्य पूर्णत्वास जाते.