सकाळ डिजिटल टीम
तुम्ही कधी लक्ष दिलं का? बऱ्याच 5 स्टार हॉटेलमध्ये सीलिंग फॅन नसतात. यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत.
पंख्यांची मोटर जळणं, ब्लेड खराब होणं, तुटणं यासाठी वारंवार दुरुस्ती लागते – हॉटेलसाठी हे खर्चिक ठरतं.
5 स्टार हॉटेलमध्ये सेंट्रल एसी प्रणाली असते. त्यामुळे खोलीत वेगळा पंखा न ठेवणे हे तापमान नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतं.
उंचीवर पंखा असल्याने जर बेडवर उडी मारली, तर डोकं पंख्याला लागून अपघात होण्याची शक्यता असते विशेषतः लहान मुलांबरोबर प्रवास करताना.
दररोज पंख्याची ब्लेड्स स्वच्छ करणं शक्य होत नाही. धूळ साचल्यास गेस्ट नाराज होतात आणि रिव्ह्यू खराब होतात.
प्रत्येक खोलीत पंखा बसवणे व तो मेंटेन करणे महागडं पडतं. याऐवजी एक सेंट्रल युनिट मेंटेन करणं सोपं आणि स्वस्त ठरतं.
पंखे वारंवार बिघडतात, त्यात वेळ आणि माणसांची गरज लागते – त्यामुळे हॉटेल व्यवस्थापन हे टाळतात.
हॉटेलमध्ये प्रत्येक खोलीत समान तापमान ठेवण्यासाठी पंख्याऐवजी केवळ एसीच वापरला जातो.