सोन्याचे दागिने बनवल्यानंतर सोनार कपडे का जाळतात?

Aarti Badade

सोन्याचे गगनाला भिडलेले भाव

सध्या सोन्याचे दर प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून, एका तोळ्याचा भाव तब्बल दीड लाखांवर पोहोचला आहे.

Burn Clothes After Making Gold Jewelry

|

Sakal

कारागिरांची अनोखी पद्धत

सोन्याचे दागिने घडवणारे कारागीर काम करताना वापरलेले कपडे, मशीन पुसण्याचे फडके आणि जमिनीवरील कार्पेट देखील ठराविक काळानंतर जाळून टाकतात.

Burn Clothes After Making Gold Jewelry

|

Sakal

दागिने घडवण्याची प्रक्रिया

दागिना तयार करताना सोन्याला विविध आकार देण्यासाठी सुरुवातीला त्याचे मोठ्या लांब काडीत रूपांतर करून ते ठोकले आणि कट केले जाते.

Burn Clothes After Making Gold Jewelry

|

Sakal

सोन्याच्या कणांचे नुकसान

सोन्याला ठोकताना आणि कट करताना त्याचे अत्यंत सूक्ष्म व बारीक कण कपड्यांवर, मशीनवर तसेच आजूबाजूच्या परिसरात उडतात.

Burn Clothes After Making Gold Jewelry

|

Sakal

कपडे जाळण्यामागचे कारण

जेव्हा सोन्याचे बारीक कण पडलेले हे कापड जाळले जाते, तेव्हा कापड जळून खाक होते आणि मौल्यवान सोन्याचे कण त्यापासून वेगळे होतात.

Burn Clothes After Making Gold Jewelry

|

Sakal

नुकसान टाळण्यासाठी उपाय

अशा प्रकारे कापड जाळून जमा झालेले सोने पुन्हा एकदा वितळवून नवीन दागिने बनवण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी वापरात आणले जाते.

Burn Clothes After Making Gold Jewelry

|

Sakal

मेहनतीचे फळ

एका सोन्याचा दागिना बनवण्यासाठी कारागिरांना तासनतास प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि सोन्याचा एकही कण वाया जाऊ नये म्हणून ही पद्धत वापरली जाते.

Burn Clothes After Making Gold Jewelry

|

Sakal

मुलांप्रमाणे मुलींच्या जीन्सला पुढे चेन का असते?

women jeans zipper history

|

Sakal

येथे क्लिक करा