हॉटेल्समध्ये काचेचे बाथरूम का असतात? ९९% लोकांना माहित नाही

Mansi Khambe

काचेचे बाथरूम

बाथरूम किंवा टॉयलेट या जागा चार भिंतीत बंद असावी अशी आहे. मात्र अनेकदा हॉटेल्समध्ये काचेचे बाथरूम असतात. या काचेमुळे आरपार सर्व दिसून येतं. पण हॉटेल्समध्ये काचेच्या भिंती असणारे बाथरूम का असतात?

Hotel Glass Bathroom

|

ESakal

आधुनिक डिझाइन

सध्या हॉटेल्समध्ये आधुनिक डिझाइनचा ट्रेंड खूप वाढला आहे. काचेचे दरवाजे किंवा भिंती देखील याच डिझाइनचा एक भाग आहेत. हॉटेलला लक्झरी आणि स्टायलिश लुक देण्यासाठी काचेचे बाथरूम बनवणे हॉटेल्सची नवी ओळख झाली आहे.

Hotel Glass Bathroom

|

ESakal

काचेचे दरवाजे

सुंदर फिटिंग्ज, मार्बलची सजावट आणि आकर्षक लाइटिंगसह काचेच्या दरवाजांचे बाथरूम बनवले जातात. यामुळे पाहुण्यांना हॉटेलमध्ये थांबण्याचा अनुभव आणखी खास वाटतो.

Hotel Glass Bathroom

|

ESakal

स्टायलिश

तसेच हॉटेल्समधील रूम आणखी स्वच्छ, स्टायलिश आणि खुली दिसते. त्याचबरोबर कमी जागेतही खोली मोठी दिसून अधिक आरामदायक वाटते.

Hotel Glass Bathroom

|

ESakal

खोली अधिक मोठी

तसेच काचेच्या भिंतींमुळे खोलीत प्रकाश पसरतो, ज्यामुळे खोली अधिक खुली आणि मोठी दिसते. यामुळे बऱ्याचदा लहान आकाराच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये असे डिझाइन वापरले जातात.

Hotel Glass Bathroom

|

ESakal

नैसर्गिक प्रकाश

अनेक हॉटेल्सच्या बाथरूममध्ये खिडकी नसते. अशावेळी नैसर्गिक प्रकाश काचेच्या भिंतीतून बाथरूमपर्यंत पोहोचतो.

Hotel Glass Bathroom

|

ESakal

ऊर्जेची बचत

काही हॉटेल्स या डिझाइनचा वापर खोलीत उष्णता किंवा थंडी पसरवण्यासाठी करतात. ज्यामुळे ऊर्जेची बचत आणि विजेचा वापरही कमी होतो.

Hotel Glass Bathroom

|

ESakal

स्मार्ट ग्लास

हॉटेलमध्ये पूर्णत: पारदर्शक काचेचा वापर केला जात नाही. अनेक हॉटेल्स फ्रॉस्टेड, टिंटेड किंवा स्मार्ट ग्लास लावतात, जे एक बटण दाबल्यावर अपारदर्शक होतात.

Hotel Glass Bathroom

|

ESakal

स्लाइडिंग पॅनेल

याशिवाय अनेक खोल्यांमध्ये पडदे, ब्लाइंड्स किंवा स्लाइडिंग पॅनेलदेखील लावले जातात, जे गरजेनुसार बंद करून प्रायव्हेसी मिळवता येते.

Hotel Glass Bathroom

|

ESakal

'या' ३ लोकांपासून नेहमीच राहा सावध, चाणक्य नीती काय सांगते?

Chanakya Niti

|

ESakal

येथे क्लिक करा