उकाडा की गंभीर आजार? रात्री झोपेत सतत घाम येण्यामागील कारणे जाणून घ्या

Aarti Badade

रात्री येणारा घाम आणि दुर्लक्ष

अचानक अंग घामाने भिजणे, कपडे किंवा उशी ओली होणे असा अनुभव अनेकजण घेतात. बरेच लोक याकडे उकाडा समजून दुर्लक्ष करतात, शरीराने दिलेला गंभीर संकेत असू शकतो.

Reasons for night sweats

|

Sakal

कधी काळजी करावी?

कधीतरी घाम येणे सामान्य आहे. झोप मोडत असेल आणि त्यासोबत ताप, अचानक वजन कमी होणे, खोकला किंवा तीव्र अशक्तपणा जाणवत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

Reasons for night sweats

|

Sakal

सामान्य आणि हार्मोनल कारणे

जास्त तापमान, जाड ब्लँकेट किंवा मानसिक ताण यांमुळे घाम येऊ शकतो. मात्र, महिलांमध्ये मेनोपॉज किंवा हार्मोन्समधील बदलांमुळे शरीराचे तापमान नियंत्रण बिघडते आणि रात्री अचानक घाम येतो.

Reasons for night sweats

|

Sakal

मानसिक ताण आणि चिंता

दिवसभराचा अतिमानसिक ताण आणि अस्वस्थता रात्री झोपेतही शरीरावर परिणाम करतात. यामुळे झोपेत अचानक हृदयाचे ठोके वाढणे, घाम येऊन जाग येणे असे प्रकार घडतात.

Reasons for night sweats

|

Sakal

अंतर्गत आजारांचे सुरुवातीचे लक्षण

तकपडे किंवा बेडशीट पूर्ण भिजेल इतका घाम येत असल्यास ते टीबी , हायपरथायरॉईडीझम, स्लीप एपनिया किंवा मधुमेह यांसारख्या अंतर्गत आजारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

Reasons for night sweats

|

Sakal

आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय

झोपण्याची खोली नेहमी हवेशीर आणि थंड ठेवावी.रात्रीच्या वेळी हलके व सुती कपडे वापरावेत. रात्री अतिमसालेदार जेवण, कॅफिन (चहा-कॉफी) आणि अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे टाळावे.

Reasons for night sweats

|

Sakal

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

योग्य बदल करून आणि ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन करूनही जर ही समस्या कायम राहत असेल, तर स्वतःच्या मनाने औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Reasons for night sweats

|

Sakal

मधुमेह असूनही तूप खाताय? डॉक्टरांचे मत जाणून घ्या!

ghee good for diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा