भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांची सॅल्यूट शैली वेगळी का? असा आहे कडक इतिहास

Anushka Tapshalkar

भारताचे सशस्त्र दल – देशाचा अभिमान

भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल हे जगातील सर्वात शिस्तबद्ध, ताकदवान आणि समर्पित सशस्त्र दलांपैकी एक मानले जातात. देशाच्या सीमा, सागर आणि आकाशाचे रक्षण करणाऱ्या या तिन्ही दलांची शौर्यगाथा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

Indian Armed Forces | sakal

सॅल्यूट – शिस्तीचं आणि सन्मानाचं प्रतीक

सॅल्यूट ही केवळ कृती नसून सैनिकी शिस्त, आदर आणि आत्मसन्मान यांचं प्रतिक आहे. प्रत्येक सशस्त्र दलात सीनियर अधिकाऱ्यांना सॅल्यूट करणं ही एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे.

Salute | sakal

तिन्ही दलांची सॅल्यूट शैली वेगळी का?

भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल – या तिन्ही दलांतील अधिकारी सॅल्यूट करतात, पण सॅल्यूट करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. ही वेगळी शैली त्यांच्या इतिहास, कार्यपद्धती आणि परंपरेशी जोडलेली आहे.

Why do the Indian Army, Navy and Air Force have different salute | sakal

भारतीय सैन्याची सॅल्यूट शैली

भारतीय सैन्याचे जवान आणि अधिकारी हाताचा तळवा समोर ठेवत सरळपणे सॅल्यूट करतात.

Indian Army Salute | sakal

यामागील अर्थ

हाताचा तळवा समोर असणं म्हणजे प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आदर याचे प्रतीक मानले जाते.

Indian Army Salute | sakal

भारतीय नौदलाची सॅल्यूट शैली

नौदलातील सॅल्यूटमध्ये हात जमिनीच्या दिशेने ९० अंशात झुकलेला असतो आणि हाताचा तळवा खाली असतो.

Indian Navy Salute | sakal

यामागील इतिहास

पूर्वी खलाशांचे हात जहाजावरील कामामुळे तेलकट असत. त्यामुळे हाताचा तळवा दाखवणं ही अपमानास्पद गोष्ट मानली जायची म्हणून नौदल अधिकारी थोडा खाली झुकलेला सॅल्यूट करतात.

Indian Navy Salute | sakal

भारतीय हवाई दलाची सॅल्यूट शैली

हवाई दलात सॅल्यूट करताना हात ४५ अंश कोनात वर झुकवलेला असतो, जो आकाशाकडे झुकलेला असतो.

Indian Air Force Salute | sakal

यामागील संदेश आणि अभिमान

हवाई दलाची सॅल्यूट शैली त्यांच्या आकाशातील प्रगतीचे प्रतीक आहे. तीनही दलांच्या सॅल्यूट शैली म्हणजे त्यांचा आत्मसन्मान, परंपरा आणि शिस्तीचा अभिमान.

Indian Air Force Salute | sakal

एक गाव, शेकडो अधिकारी! IAS-IPS ची फॅक्टरी असलेलं 'हे' गाव तुम्हाला माहित आहे का?

आणखी वाचा..