आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा असं का म्हणतात?

Anushka Tapshalkar

आषाढात 'तळलेलं' का खावं?

पावसाची सुरुवात होताच शरीरात वातदोष वाढतो. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, अंगदुखी यांसारख्या समस्या वाढतात. तेलकट पदार्थ वात शांत करण्यास मदत करतात.

Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon

|

sakal

आषाढातील पारंपरिक पदार्थ

या महिन्यात पापड, कुरडया, सांडगे, कांदा भजी यांसारखे तळलेले पदार्थ खाण्याची परंपरा आहे. हे फक्त चव नाही तर ऋतूनुसार शरीराला आधार देतात.

Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon

|

sakal

श्रावणात 'भाजलेलं' अन्न का?

श्रावणात वातावरणातील थंडी आणि दमटपणा वाढल्याने पचनशक्ती मंदावते. त्यामुळे भाजलेले पदार्थ हलके आणि सहज पचणारे ठरतात.

Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon

|

sakal

श्रावणातील आरोग्यदायी भाजलेले पदार्थ

भाजलेले शेंगदाणे, मका, लाह्या, फुटाणे, वांगे, तांदूळ यांसारखे पदार्थ पचन सुधारण्यास आणि सर्दी-खोकल्याचा धोका कमी करण्यास मदत करतात.

Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon

|

sakal

भाद्रपदात 'उकडलेलं' का खावं?

या काळात पित्तदोष वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उकडलेले पदार्थ शरीराला हलके पडतात आणि पचनसंस्थेवरील ताण कमी करतात.

Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon

|

sakal

भाद्रपदातील योग्य आहार

उकडलेले शेंगदाणे, कंदमुळे, मोड आलेली कडधान्ये, उकडलेली कडधान्ये यांचा आहारात समावेश केल्यास पित्त संतुलित राहण्यास मदत होते.

Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon

|

sakal

परंपरेमागे दडलंय आरोग्यशास्त्र

कुरडू, टाकळा, आघाडा, कारटुलं, भारंगी यांसारख्या रानभाज्या औषधी गुणांनी समृद्ध मानल्या जातात. भारतीय सण, परंपरा आणि ऋतूनुसार आहार हे निरोगी जीवनासाठी तयार झालेले आरोग्यशास्त्र असल्याचे मानले जाते.

Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon

|

sakal

मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या येण्यासाठी काय करावे?

How to Get More Chillies on Chilli Plant

|

Sakal

आणखी वाचा