Anushka Tapshalkar
जीन्सच्या खिशांजवळ दिसणारे छोटे मेटलचे तुकडे ‘रिव्हेट्स’ (Rivets) म्हणून ओळखले जातात. पण त्यांचा उगम फक्त फॅशनमध्ये नाही, तर कामगारांच्या कपड्यांना मजबूत बनवण्यात आहे.
Jeans Rivets History and Purpose
sakal
पूर्वी खाणीत काम करणारे मजूर आणि इतर कामगार जीन्ससारख्या कामाच्या पँट वापरत. खिशांमध्ये जड वस्तू ठेवल्यामुळे खिशांच्या कोपऱ्यांवर आणि शिवणांवर जास्त ताण येऊन पँट फाटत असे.
Jeans Rivets History and Purpose
sakal
टेलर जेकब डेव्हिस यांच्याकडे कामगारांच्या पँट वारंवार फाटण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यावर त्यांनी खिशांच्या कमकुवत भागांना तांब्याच्या रिव्हेट्सने मजबूत करण्याची कल्पना शोधून काढली.
Jeans Rivets History and Purpose
sakal
रिव्हेट्समुळे जीन्सच्या ज्या भागांवर सर्वाधिक ताण येतो, ते भाग अधिक मजबूत झाले. त्यामुळे खिशांच्या कोपऱ्यांवरील आणि शिवणांवरील फाटण्याचे प्रमाण कमी झाले.
Jeans Rivets History and Purpose
sakal
ही कल्पना यशस्वी झाल्यानंतर जेकब डेव्हिस यांनी Levi Strauss & Co. सोबत भागीदारी केली. २० मे १८७३ रोजी तांब्याच्या रिव्हेट्स असलेल्या डेनिम पँटच्या डिझाइनचे पेटंट घेण्यात आले.
Jeans Rivets History and Purpose
sakal
आजच्या काळात शिवणकामाच्या आधुनिक पद्धती आणि मजबूत डेनिममुळे रिव्हेट्स पूर्वीसारखे आवश्यक राहिलेले नाहीत. तरीही त्यांना जीन्सच्या क्लासिक डिझाइनचा भाग म्हणून कायम ठेवले जाते.
Jeans Rivets History and Purpose
sakal
जीन्सवरचे हे छोटे रिव्हेट्स म्हणजे फॅशनसोबत जोडलेला इतिहास आहे. कामगारांच्या पँट वारंवार फाटू नयेत म्हणून सुरू झालेली ही कल्पना आज जीन्सच्या ओळखीचा एक खास भाग बनली आहे.
Jeans Rivets History and Purpose
sakal
Hanger Loops Purpose and Benefits
sakal